शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या विक्रीप्रकरणी दोघांना अटक

By admin | Updated: January 5, 2015 04:41 IST

गडचांदुरातील अल्पवयीन मुलींची राजस्थान व मध्य प्रदेशात विक्री करून विवाह लावून देण्यात आला होता. गडचांदूर ठाण्यातील

गडचांदूर (जि़चंद्रपूर) : गडचांदुरातील अल्पवयीन मुलींची राजस्थान व मध्य प्रदेशात विक्री करून विवाह लावून देण्यात आला होता. गडचांदूर ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन उईके यांच्या नेतृत्वातील पथकाला सदर प्रकरणाचा शोध घेण्यात यश आले आह़े प्रत्येकी दीड लाखात अल्पवयीन मुलींची विक्री करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी प्रकाश मालवी (४५) आणि शोभा राऊत (४३) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गडचांदूर येथून ३ डिसेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या़ याप्रकरणी त्यांच्या पालकांनी मुली बेपत्ता असल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, ५ डिसेंबरला आग्रा रेल्वेस्थानकावरून राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील रूपवास येथे दोघांनी मुलीला नेले. बनीया ऊर्फ राजकुमार जोगी या दलालाच्या मदतीने रूपवास येथील प्रेमसिंग गुर्जर या तरुणाशी एका मुलीचा विवाह लावून देण्यात आला होता. नंतर दुसऱ्या मुलीला शोभा व प्रकाश उज्जैनला आले. प्रकाश हा मुळचा उज्जैनचा असल्याने तेथे त्याची ओळख होती. बोरमुंडला गावातील राहुल मालवी याच्याशी तिचा विवाह लावून देण्यात आला. या प्रकरणात प्रकाश व शोभा हिने दलालांच्या मदतीने आर्थिक व्यवहार केल्याचेही निष्पन्न झाले आहे. प्रत्येकी एक ते दीड लाखात अल्पवयीन मुलींची विक्री करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात उघड झाले आहे. (प्रतिनिधी)