शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक

By admin | Updated: July 21, 2014 03:24 IST

डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जून महिन्यात १७ वर्षीय विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन अज्ञात तरुणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

कल्याण : डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जून महिन्यात १७ वर्षीय विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन अज्ञात तरुणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. तसेच त्या नराधमांना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी विविध सामाजिक संस्थांसह पालकांनी केली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून एक महिन्याच्या कालावधीत रोहन भोईर आणि अबू अन्सारी या दोघांना अटक केली. दोघेही आजदेगाव परिसरातील रहिवासी असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद शेलार यांनी लोकमतला सांगितले.युवती सुदामानगर परिसरातील तिच्या घराजवळ बेशुद्धावस्थेत आढळली होती. तिच्या पालकांनी तिला जवळच असणाऱ्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्यावर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. तसेच गुंगीचे औषध देऊन या तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. शहरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मात्र, बेशुद्धावस्थेत अत्याचार झाल्याने मुलगी आरोपींना ओळखत नव्हती. त्यामुळे पोलिसांसमोर या आरोपींना पकडणे मोठे आव्हान होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, शेकडो तरुणांची चौकशी आणि विविध तपासाच्या क्लृप्त्या योजून अखेर याप्रकरणी गुरुवारी रात्री रोहन भोईर आणि अबू अन्सारी या दोन आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली. कॉलेज परिसरात भटकणे आणि मुलींची छेडछाड करणे, असे प्रकार ते करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली. याबाबत पोलीस पुढील तपास करीत असून आरोपींनी यापूर्वीदेखील असे काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)