शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कॉर्पोरेट कार्यालयात बॉसकडून तरुणीची फसवणूक

By admin | Updated: July 7, 2016 08:57 IST

कॉर्पोरेट जगतात महिलांचा छळ होत असल्याचे आपण सिनेमांमध्ये पाहिले असेल. काही वेळा अशा घटना कानावरही येतात.

- पूजा दामले मुंबई

कॉर्पोरेट जगतात महिलांचा छळ होत असल्याचे आपण सिनेमांमध्ये पाहिले असेल. काही वेळा अशा घटना कानावरही येतात.पण अशा छळाचा केवढा मानसिक त्रास होऊन तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो, हे एका घटनेतून समोर आले आहे. सतत ताणाखाली असल्यामुळे अचानक शांत झालेल्या सोनलला (नाव बदलले आहे) घरच्यांनी काय झाले? असे विचारले. पण, समाधानकारक उत्तर सोनलकडून न मिळाल्याने तिला जेजे रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञांकडे नेण्यात आले. तेव्हा आॅफिसमधील बॉसने प्रेमाचे खोटे नाटक करुन शरीरसंबंध ठेवून फसवल्याचे वास्तव समोर आले.मुंबईत राहणाऱ्या २५ वर्षीय सोनलला पदवी संपादन केल्यावर एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरी मिळाली. कॉर्पोेरेट क्षेत्रातील मोकळ्या वातावरणाला सोनल काही प्रमाणात भुलली होती. त्यामुळे ५० वर्षीय बॉसचे आपल्यावर खरोखरच प्रेम असल्याचा काही दिवसांत तिचा समज झाला. दोघांचे प्रेमसंबंध अधिक दृढ होत गेले. कालांतराने बॉसकडून नात्यातल्या अपेक्षा वाढत गेल्या. दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. या वेळी बॉसने शारीरिक संबंधांवेळीचे फसवून फोटो काढले. त्यानंतर त्याचा खरा चेहरा तिच्या समोर आला. फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तो तिच्याकडे जबरदस्ती करू लागला. त्याच्याकडे फोटो असल्यामुळे आणि नोकरी टिकवण्यासाठी सोनल या जबरदस्तीला बळी पडली. प्रेमसंबंधांचे नाटक असल्याचे लक्षात आल्यावर सोनलवरचा ताण वाढत गेला. परिणामी तिच्या वर्तनात बदल होत गेले. घरच्या लोकांशी तिचा संवाद कमी झाला. सोनलच्या वर्तनातील बदल पाहून कुटुंबीयांनी तिला जेजे रुग्णालयातील मानसोपचार विभागात नेले. पहिल्यांदा सोनल तणावाखाली असल्याची लक्षणे होती. तिच्या तणावाचे कारण शोधण्यात दोन सत्रे गेली. पण, तोपर्यंत ती काहीही बोलत नव्हती. तिसऱ्या सत्रावेळी सोनलने हा सगळा प्रकार कथन केला. हळूहळू घडलेला सगळा प्रकार तिने सांगितल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्रेमसंबंधाचे नाटक करून फसविल्याच्या या प्रकारामुळे कॉर्पोरेट जगतातील हे विदारक वास्तव समोर आले. पण, अनेकदा मुली घाबरून, नोकरी सांभाळायची म्हणून अशा आमिषांना बळी पडतात. हे योग्य नाही. भीतीपोटी या प्रकरणांची नोंद पोलिसांकडे केली जात नाही. मुली महिलांनी जागरूक राहणे आवश्यक असल्याचेही डॉ. मुंदडा यांनी स्पष्ट केले.मुलींनी काय करावे?नोकरीसाठी वा अन्य कारणांसाठी आमिषांना बळी पडू नये घाबरून जाऊ नये घरच्यांना विश्वासात घेऊन सर्व गोष्टी सांगाव्यातपोलिसांत तक्रार दाखल करावीफोटो, व्हिडीओ आहेत, म्हणून गप्प राहणे टाळावे कसा होतो छळ... कोणत्याही कामाच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी करणेस्वत:च्या अधिकारांचा वापर करून शारीरिक छळ करणेफोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून शारीरिक संबंध ठेवणेपरवाना अथवा अन्य परवानग्यांचे आमिष दाखवून शारीरिक संबंधांची मागणी करणे