शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बोरवडेत राजकीय वादातून धुमश्चक्री

By admin | Updated: October 22, 2014 05:55 IST

राजकीय पूर्ववैमनस्यातून कागल तालुक्यातील बोरवडे येथे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास माजी मंत्री हसन मुश्रीफ व मंडलिक-घाटगे गटांत तुंबळ हाणामारी झाली.

कोल्हापूर : राजकीय पूर्ववैमनस्यातून कागल तालुक्यातील बोरवडे येथे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास माजी मंत्री हसन मुश्रीफ व मंडलिक-घाटगे गटांत तुंबळ हाणामारी झाली. यावेळी मुश्रीफ गटाकडून मंडलिक-घाटगे गटांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. हाणामारीत तलवारी, लोखंडी गज, कुऱ्हाडींचा सर्रास वापर करण्यात आला. यामध्ये दोन्ही गटांचे दहाजण गंभीर जखमी झाले असून, गावात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत़ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुश्रीफ यांचे कार्यकर्ते व बिद्री कारखान्याचे संचालक गणपती गुंडू फराकटे यांचा मुलगा मनोज याने किरकोळ कारणावरुन मंडलिक-घाटगे गटाच्या संदीप कुंभार याला बेदम मारहाण केली होती. यावेळी संदीपने आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती दिल्याने दोन्ही गटांमध्ये मोठी वादावादी झाली. हे प्रकरण मुरगूड पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. दरम्यान, मंगळवारी पुन्हा सकाळी मुश्रीफ गटाचे गणपती फराकटे व मंडलिक-घाटगे गटाचे संभाजी फराकटे यांच्यात वादावादी होऊन तुंबळ हाणामारी झाली. अचानक उडालेल्या धुमश्चक्रीमुळे गोंधळ उडाला. यावेळी तलवार, लोखंडी गज, कुऱ्हाडींचा वापर करण्यात आल्याने दोन्ही गटांचे दहाजण गंभीर जखमी झाले. निवडणुकीच्या वादातून मारामारी झाल्याचे समजताच दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (प्रतिनिधी)