शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी अपात्रतेविषयी पुस्तक व राजपत्रात तफावत

By admin | Updated: August 27, 2014 04:14 IST

शिक्षा झालेले लोकप्रतिनिधी केवळ जामीन मिळण्यासच नव्हे तर अधिवेशनाला हजर राहण्यासही पात्र नसल्याचे परखड मत मंगळवारी उच्च न्यायालयाने व्यक्त केले़

मुंबई : शिक्षा झालेले लोकप्रतिनिधी केवळ जामीन मिळण्यासच नव्हे तर अधिवेशनाला हजर राहण्यासही पात्र नसल्याचे परखड मत मंगळवारी उच्च न्यायालयाने व्यक्त केले़बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा झालेले शिवसनेचे देवळालीचे विधानसभा सदस्य व माजी मंत्री बबनराव शंकर घोलप यांनी विशेष न्यायालयाने दोषी ठरवलेल्या निकालाला स्थगिती मिळवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीत न्या़ साधना जाधव यांनी हे मत व्यक्त केले़महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधीत्व कायद्याचे कलम ८(४) रद्द केल्याने आता लोकप्रतिनिधीला तीन वर्षांची शिक्षा झाल्यास त्याला दोषी ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली तरच संबंधित लोकप्रतिनिधी निवडणूक लढवू शकतो़ याआधी केवळ लोकप्रतिनिधीच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतर त्याला निवडणूक लढवता येत होती़ मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे कलम रद्द केल्यानंतर या कायद्याच्या नवीन पुस्तकात शिक्षा किंवा दोषी ठरवण्याच्या निकालाला स्थगिती मिळाल्यास लोकप्रतिनिधी निवडणूक लढवू शकतो, असा उल्लेख करण्यात आला आहे़ पण केंद्र शासनाने यासाठी जारी केलेल्या गॅझेटमध्ये तसा काहीच उल्लेख नाही़ तसेच गॅझेट व नवीन पुस्तकातील तरतुदीत तफावत असल्याचे घोलप यांचे वकील हर्षद पौंडा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ ते ग्राह्य धरत न्यायालयाने राज्य शासनाला याचा खुलासा करण्याचे आदेश दिले़ मुळात सरकारने अशी तफावत केलीच कशी़ तसेच ग्रामपंचायतीपासून विधानसभेसाठी निवडले गेलेल्या व शिक्षा झालेल्या अनेक लोकप्रतिनीधींनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे़ त्यामुळे वारंवार यातील कायद्याची बाजू समजून घेण्यापेक्षा राज्य शासनाने याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर केल्यास ते अधिक सोयीचे ठरले, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले़ त्यावर याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, असे सरकारी वकील संदीप शिंदे यांनी स्पष्ट केले़बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी मार्च महिन्यात विशेष न्यायालयाने घोलप व त्यांची पत्नी शशिकला यांना तीन वर्षांची शिक्षा व एक लाख रूपयांचा दंड ठोठावला़ त्यानुसार राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी घोलप यांना विधानसभेचे सदस्य म्हणून अपात्र घोषित करणारा आदेश गेल्या आठवड्यात जारी केला़ (प्रतिनिधी)