शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

‘बम बम भोले’..!

By admin | Updated: August 30, 2015 02:49 IST

रंगीबेरंगी फुलमाळांनी सजविलेली वाहने, त्यावर चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या आखाड्यांच्या श्री इष्टदेवता व ढोल-ताशांच्या गजरात धर्मध्वजा डोलाने मिरवत पवित्र कुशावर्तात

त्र्यंबकेश्वर : रंगीबेरंगी फुलमाळांनी सजविलेली वाहने, त्यावर चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या आखाड्यांच्या श्री इष्टदेवता व ढोल-ताशांच्या गजरात धर्मध्वजा डोलाने मिरवत पवित्र कुशावर्तात स्रान करण्याच्या लागलेल्या ओढीतून ‘बम बम भोले’ अशा घोषणा देत जत्थ्याने निघालेल्या दहाही आखाड्यांच्या हजारो साधू-महंतांचे पहिल्या पर्वणीचे शाहीस्नान सहा तासांनंतर पार पडले. आखाड्यांच्या शाही मिरवणुकीत भाविकांनी केलेल्या घुसखोरीमुळे पोलिसांना वेळोवेळी करावा लागलेला हस्तक्षेप व त्यातून झालेली रेटारेटी, आखाड्यांच्या महंतांना त्यासाठी करावी लागणारी मध्यस्थीचे प्रकार वगळता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या स्रानाने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. शनिवारच्या शाहीस्रासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री नरेंद्रगिरीजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव प्रवीण तोगडिया, जगत्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंदजी, शांतीगिरी महाराज यांच्यासह प्रमुख आखाड्यांचे श्री महंत सहभागी झाले होते. शाहीस्रानासाठी त्र्यंबकेश्वरच्या दहाही आखाड्यांच्या वेळा अगोदरच निश्चित करण्यात आलेल्या असल्या तरी, आखाड्यापासून निघणाऱ्या मिरवणुका व प्रत्यक्ष कुशावर्तापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी पाहता, शाहीस्रानाचा पहिला मान असलेल्या पंचदशनाम जुना आखाड्याने दिलेली वेळ काटेकोरपणे पाळत ४ वाजून १० मिनिटांनी कुशावर्त गाठले.यावेळी पुरोहित संघाने मंत्रोच्चाराच्या गजरात जुना आखाड्याच्या इष्टदेवतांना आवाहन करून आखाड्याचे प्रमुख महंत श्री हरिगिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व ‘हर हर महादेव’ असा गजर करून साधू-महंतांनी कुशावर्तात स्वत:ला झोकून दिले. यावेळी श्री श्री अवधेशानंदजी, विश्वेश्वरानंदजी, शंकरानंद गिरीजी महाराज, प्रकाशानंद गिरीजी यांच्यासह शेकडो साधूंनी हातातील धर्मध्वजा, शस्त्रांसह पर्वणीत स्रान केले. या आखाड्याच्या प्रमुख महंतांचे स्रान पार पडल्यानंतर संत जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी शांतीगिरीजी महाराज यांनीही आपल्या अनुयायांसह स्रान केले. (प्रतिनिधी)