शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांद्वारे बोगस सैन्यभरती!

By admin | Updated: August 25, 2016 05:08 IST

बोगस सैन्यभरती प्रकरणात दिल्लीतील १०५ राजपुताना रायफल्समधील शिपाई संशयित गिरीराज घनश्याम चव्हाण (मूळ रा़ राजस्थान) यास नाशिक पोलिसांनी अटक केली

नाशिक : सैन्यात नोकरीचे आमिष दाखवून दिल्लीमध्ये राबविण्यात आलेल्या बोगस सैन्यभरती प्रकरणात दिल्लीतील १०५ राजपुताना रायफल्समधील शिपाई संशयित गिरीराज घनश्याम चव्हाण (मूळ रा़ राजस्थान) यास नाशिक पोलिसांनी अटक केली आहे़ त्यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बोगस सैन्यभरतीच्या या रॅकेटने सेना दलात खळबळ उडाली आहे. चव्हाण याने दिल्लीतील दोन साथीदारांची नावे सांगितली असून त्यांना दिल्लीमध्ये बुधवारी (दि़ २४) अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे़ विशेष म्हणजे बोगस कागदपत्रांद्वारे भरती झालेले हे युवक देशातील विविध सैन्यदलाच्या प्रशिक्षण कें द्रांमध्ये प्रशिक्षण घेत होते़ नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरमध्ये संशयित बालवीर गुजर (२२, राजस्थान), सचिन किशनसिंग (१९,रा़ राजस्थान), तेजपाल चोपडा (१९, रा़ राजस्थान) व सुरेश महंतो (२१, रा़ राजस्थान) हे चौघे प्रशिक्षण घेत होते़ त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांकडे प्रशिक्षणासाठी सोपविलेली दिल्ली येथील सैन्यभरतीची कागदपत्रे बनावट व खोटी असल्याचे ११ जुलै २०१६ रोजी उघड झाले होते़ त्यांना लष्करी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन नाशिकरोड पोलिसांकडे सुपूर्द केले असता त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला़दिल्लीमध्ये सैन्यभरतीचे आमिष दाखवून बोगस कागदपत्रांद्वारे भरती करून फसवणूक केल्याचे समोर आले़ ही फसवणूक व बोगस सैन्यभरतीमध्ये दिल्लीतील लष्करी शिपाई गिरिराज चव्हाण व एजंटचे रॅकेट सहभागी असल्याचे पोलीस तपासात समोर आले़ नाशिकरोड पोलिसांनी संशयित शिपाई गिरिराज चव्हाण यास दोन दिवसांपूर्वी अटक करून न्यायालयात हजर केले.सुमारे ५० युवकांना बोगस कागदपत्रे तयार करून देत त्यांची आर्थिक लूट करण्यात आल्याचे समोर आले आहे़ (प्रतिनिधी)>युवकांना सैन्य भरतीचे आमिष दाखवून दिल्लीमध्ये ही बनावट सैन्यभरती प्रक्रिया राबविण्यात आल्याचे समोर आले आहे़ सुमारे ५० युवकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. लष्करी अधिकारी व एजंटांचे मोठे रॅकेट असून त्यातील तिघांना आतापर्यंत अटक केली आहे़- श्रीकांत धिवरे, पोलीस उपआयुक्त, नाशिक