शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

बोगस प्रमाणपत्रांंमुळे भरती रद्द

By admin | Updated: May 21, 2014 03:16 IST

पुणे आरोग्य सेवा विभागात लिपिक पदासाठी अर्ज भरणार्‍या उमेदवारांनी बोगस टायपिंग सर्टिफिकेट सादर केल्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने ही संपूर्ण भरती व निवड प्रक्रियाच रद्द केली़

अमर मोहिते , मुंबई - पुणे आरोग्य सेवा विभागात लिपिक पदासाठी अर्ज भरणार्‍या उमेदवारांनी बोगस टायपिंग सर्टिफिकेट सादर केल्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने ही संपूर्ण भरती व निवड प्रक्रियाच रद्द केली़ या निकालात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टानेही नकार दिला आहे़ विशेष म्हणजे, या पदासाठी निवड झालेल्या काही उमेदवारांनी सुरुवातीस बोगस टायपिंग सर्टिफिकेट सादर केले व नंतर एका खासगी टायपिंग इन्स्टिट्यूटमधील सर्टिफिकेट सादर केले़ मात्र तेही सरकारमान्य नसल्याचा ठपका मॅटने ठेवला़ मॅटचे अध्यक्ष राजीव अग्रवाल व सदस्य श्रीहरी डावरे यांना हा निकाल दिला़ या प्रकरणी या पदासाठी अर्ज भरून निवड न झालेले सोलापूर येथील मेहमूद सुभेदार यांनी अ‍ॅड़ अरविंद बांदिवडेकर व भूषण बांदिवडेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती़ या पदासाठी २००८मध्ये अर्ज मागवण्यात आले़ त्यानंतर याची परीक्षा घेण्यात आली़ तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांचाही अंतिम निवड यादीत समावेश करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले़ मात्र शिक्षण पात्रता अधिक असून, इतर उमेदवारांना निवड यादीत आपल्यापेक्षा वरच्या स्थानी ठेवण्यात आले़, असा आरोप सुभेदार यांनी याचिकेत केला़ महत्त्वाचे म्हणजे या परीक्षेत काही उमेदवारांच्या उत्तर पत्रिकेत खाडाखोड झाली होती व काही जणांनी बोगस टायपिंग सर्टिफिकेट सादर केले होते़ हे सर्व माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीतून उघड झाल्याचेही अ‍ॅड़ बांदिवडेकर यांनी मॅटच्या निदर्शनास आणून दिले.त्याची शहानिशा करण्यासाठी लवादाने या भरती प्रक्रियेची नियमावली तपासली़ त्यात टायपिंगचा ३० प्ऱमि़ वेग असलेला उमेदवार या पदासाठी पात्र आहे. दरम्यान, उमेदवारांनी बोगस टायपिंग सर्टिफिकेट सादर केल्याने ही भरती व निवड प्रक्रियाच रद्द केल्याचे मॅटने जाहीर केले़ याला निवड झालेल्या काही उमेदवारांनी उच्च न्यायालयातही आव्हान दिले़ मात्र न्यायालयाने मॅटच्या निकालात हस्तक्षेप करण्यास नकार दिला़ त्यानंतर निवड झालेल्या काही उमेदवारांनी या आदेशाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारी याचिका मॅटमध्ये दाखल करण्यात आली आहे़