शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात बोगस जीआरचे पेव!

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण अथवा नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण दिले जाईल, अशा आशयाचा शासनादेश (जीआर)

- यदु जोशी,  मुंबईजिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण अथवा नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण दिले जाईल, अशा आशयाचा शासनादेश (जीआर) बोगस असल्याचे उघडकीस आले असून, शिक्षण खात्याने याची गंभीर दखल घेत पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारचे आणखी काही बोगस जीआर सोशल मीडियावर फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जि.प. शाळांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात आरक्षण देण्यात येणार असलेल्या शासन आदेशाची (जीआरची) प्रत ‘लोकमत’कडे उपलब्ध झाल्याने यासंबंधीचे वृत्त ४ डिसेंबरच्या अंकात देण्यात आले होते. तथापि, हा जीआरच बोगस असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा या ग्राम विकास विभागाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे या शाळांबाबतचा कोणताही धोरणात्मक निर्णय हा ग्रामविकास विभागानेच घेणे अपेक्षित असताना संबंधित जीआर शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव रा.ग.गुंजाळ यांच्या नावे काढण्यात आला आहे. मात्र, अशा प्रकारचा बोगस जीआर काढून पालक, विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे आता उघड झाले आहे. या मागे एखादे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्पर्धात्मक वातावरणात जि.प. शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर, ही पटसंख्या वाढावी म्हणून आरक्षणाचे आमिष दाखविणारा बोगस जीआर काढण्यात आला असण्याची शक्यता आहे. तर काहींच्या मते निव्वळ खोडसाळपणातून हा बोगस जीआर काढण्यात आला असून शालेय शिक्षण विभागाच्या बाबतीत असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. असेही बोगस जीआर!राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केल्याचा असाच एक बोगस शासन आदेश काढण्यात आला असून तोही सोशल मीडियात फिरत आहे. शिवाय, शिक्षक भरतीमध्ये यापुढे डीएडऐवजी बीएड पदवीधारकांना प्राधान्य, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, असेही बोगस जीआर काढण्यात आले असून या मागे एखादे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बोगस जीआर काढून अफवा पसरविण्याचा प्रकार धक्कादायक आहे. गेल्या काळातही असे प्रकार घडले असतील तर त्याची एकत्रित तक्रार पोलिसांकडे केली जाईल. शिक्षण विभागातर्फेही स्वतंत्र चौकशी केली जाईल. - नंदकुमार प्रधान, सचिव, शालेय शिक्षण विभागजि.प. शाळांतून शिकल्यास पुढे आरक्षण देण्यासंबंधी कोणताही जीआर शिक्षण खात्याने काढलेला नाही. अशा निर्णयाचा कोणताही प्रस्ताव आमच्या विभागाच्या विचाराधीन नाही. मात्र, घडलेला प्रकार गंभीर आहे. - रा.ग. गुंजाळ, उपसचिव, शालेय शिक्षण विभाग