शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरच्या दुसऱ्या पतीला अटक

By admin | Updated: April 4, 2017 04:16 IST

कोणतीही पात्रता नसताना बिनबोभाटपणे डॉक्टरकी करणाऱ्या डोंबिवली येथील एका महिलेच्या दुसऱ्या पतीलाही ठाणे पोलिसांनी रविवारी अटक केली.

ठाणे : कोणतीही पात्रता नसताना बिनबोभाटपणे डॉक्टरकी करणाऱ्या डोंबिवली येथील एका महिलेच्या दुसऱ्या पतीलाही ठाणे पोलिसांनी रविवारी अटक केली. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (घटक क्रमांक-१) ३० मार्च रोजी डोंबिवली येथील उंबर्ली रोडवरील साईबाबा नर्सिंग होमवर छापा टाकून बोगस डॉक्टर अनिता एस. ऊर्फ अनिता पोपट सावंत ऊर्फ अनिता मुरलीधर लोंढे ऊर्फ अनिता मोहम्मद सोहेल कश्मिरी हिला अटक केली होती. तिच्याजवळ वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना पोलिसांना आढळला नव्हता. दुसरा पती मोहम्मद सोहेल कश्मिरी याच्या मदतीने कल्याणफाटा परिसरात साईबाबा हॉस्पिटल गतमहिन्यात सुरू केले होते, अशी माहिती या महिलेने पोलिसांना तपासादरम्यान दिली. त्यानुसार, पोलिसांनी कल्याणफाट्यावरील साईप्रसाद इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील सुमारे १२०० चौरस फुटांच्या सुसज्ज हॉस्पिटलची पाहणी केली. येथून औषधे, इंजेक्शनसह आणि अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले असून हॉस्पिटलला सील ठोकले आहे.आरोपीच्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये मोहम्मद सोहेल व्यवस्थापक म्हणून काम बघायचा. गुन्ह्यातील त्याचा सहभाग स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही मदत घेतली होती. (प्रतिनिधी)