शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावजवळ सापडलेला मृतदेह रुद्रगौडाचा ?

By admin | Updated: October 29, 2015 00:47 IST

पोलिसांकडून दुजोरा नाही : कर्नाटक सीआयडीचे पथक बेळगावात दाखल

बेळगाव : जिल्ह्यातील खानापूरच्या जंगलात गोळ््या घालून खून करण्यात आलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. तो ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि पुरोगामी विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणात दोन संशयित मारेकऱ्यांपैकी एकाच्या रेखाचित्राशी साधर्म्य असणारा आहे. सनातनचा साधक रुद्रगौडा पाटील याचा हा मृतदेह असल्याच्या वृत्ताने बुधवारी एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. कर्नाटकच्या सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर या प्रकरणाच्या चौकशीसाठी बेळगावात रात्री दाखल झाले आहेत. खानापूरजवळील माणिकवाडी येथील जंगलात ग्रामस्थांना १८ आॅक्टोबर रोजी एक अनोळखी मृतदेह दिसला. (पान १ वरून) त्याला गोळ््या घालून ठार करण्यात आले असावे, असे त्याच्या शरीरावरील गोळ््यांच्या व्रणांनी दिसत होते. त्यातील एक गोळी छातीवर आणि दुसरी पोटावर मारण्यात आली आहे. या मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन केल्यानंतर मंगळवारी त्याचे दफन केले. जंगलात सापडलेल्या मृतदेहाचे छायाचित्र खानापूर येथील एका व्यक्तीने मोबाईलवर काढले होते. तो मृतदेह आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर जाहीर केलेले मारेकऱ्याचे रेखाचित्र यात साम्य असल्याचे छायाचित्र काढलेल्या व्यक्तीच्या ध्यानात आले. नंतर त्याने मृतदेहाचे छायाचित्र आणि कलबुर्गी यांच्या मारेकऱ्याचे पोलिसांनी जाहीर केलेले रेखाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी कलबुर्र्गी यांच्या मारेकऱ्याच्या चेहऱ्याशी अज्ञात मृतदेहाचे साम्य असल्याची ब्रेकिंग न्यूज दाखवायला सुरू केल्यावर सापडलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हा मडगाव येथे २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बेपत्ता असलेल्या रुद्रगौडा पाटीलचा असावा, अशीदेखील चर्चा रंगू लागली.वयातील फरकअज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे वय २५ ते ३० दरम्यान असण्याची शक्यता असून, रुद्रगौडाचे वय सध्या ४० किंवा त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मृतदेह रुद्रगौडाचा असण्याची शक्यता कमी असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.गावठी पिस्तुलातून गोळ््या झाडल्याचा संशय घटनास्थळी गोळीची पुंगळी सापडली आहे. त्यावरून हा खून गावठी पिस्तुलाने १७ आॅक्टोबर रोजी केला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. उमादेवीना मृतदेहाचे छायाचित्र दाखवणारदरम्यान, या मृतदेहाचे छायाचित्र कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांना तसेच त्यांच्या एका प्रत्यक्षदर्शी शेजाऱ्याला दाखविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. ३० आॅगस्ट रोजी सकाळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी कलबुर्गी यांची गोळ््या घालून हत्या केली होती. या हल्लेखोरांना उमादेवींनी पाहिले होते. तसेच घराबाहेर मोटारसायकलजवळ थांबलेल्या एका हल्लेखोराला त्यांच्या शेजाऱ्याने पाहिले होते. मृतदेह पुन्हा बाहेर काढणारकर्नाटक सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर रात्री बेळगावात दाखल झाले असून, त्यांच्या उपस्थितीत खानापूर पोलिसांनी दफन केलेला तो मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्याचा पुन्हा पंचनामा केला जाण्याची शक्यता आहे. सकृतदर्शनी कलबुर्गी यांच्या हत्येतील मारेकऱ्याचे रेखाचित्र आणि या मृतदेहाचा चेहरा यात साम्य दिसत असले तरी हा तो मारेकरीच असावा, या निष्कर्षापर्यंत अद्याप आम्ही आलेलो नाही.- बी. आर. रविकांतेगौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक, बेळगाव