शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणातून 'बोधिवृक्ष' नामशेष होण्याच्या मार्गावर!

By admin | Updated: May 14, 2014 06:01 IST

अवघ्या विश्वाला शांततेचा, प्रेमाचा, मित्रत्वाचा, बंधुत्वाचा, समतेचा आणि नैसर्गिक पर्यावरण संतुलनाचा संदेश देणारा पिंपळवृक्ष काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

 अशोक खरात, खोडद -

अवघ्या विश्वाला शांततेचा, प्रेमाचा, मित्रत्वाचा, बंधुत्वाचा, समतेचा आणि नैसर्गिक पर्यावरण संतुलनाचा संदेश देणारा पिंपळवृक्ष काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तथागत गौतम बुद्धांनी 'बोधिवृक्षा'खाली म्हणजेच पिंपळवृक्षाखाली ध्यानस्थ होऊन ज्ञानप्राप्ती केली होती. सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर दु:खमुक्तीचा मार्ग शोधून संपूर्ण मानवजातीला दु:खमुक्त होण्यासाठी संदेश दिला, अशा तथागत गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचा साक्षीदार असलेला आणि बौद्ध धम्मात पवित्र मानल्या जाणार्‍या महावृक्षांचा महाराजा म्हणून ओळखला जाणारा बोधिवृक्ष म्हणजेच पिंपळवृक्ष. या जुन्या व प्राचीन अशा पिंपळवृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असून, हा वृक्ष पर्यावरणातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार्‍या या विशालवृक्षाचे पर्यावरणातून नामशेष होणे ही बाब पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक व बाधक ठरत आहे. या बोधिवृक्षाविषयी आळे (ता. जुन्नर) येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्रज्ञ प्रा. डॉ. सविता संजयकुमार रहांगडाले 'लोकमत'शी बोलताना म्हणाल्या, की पिंपळ हा पूर्वी जवळपास प्रत्येक गावात सर्रासपणे पाहायला मिळत असायचा. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेचे पिंपळ व वटवृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी पुन्हा ही झाडे लावण्यात आली नाहीत. हा वृक्ष विहिरींमध्ये, तसेच विहिरींच्या काठावर मोठ्याप्रमाणात दिसायचा. पण, या झाडावरील पक्ष्यांची विष्ठा विहिरीत पडते म्हणून अनेकांनी हे पिंपळ तोडले आहेत. पूर्वी पिंपळ सर्रासपणे दिसायचा, आता मात्र तो मंदिर व स्मशानभूमीच्या आवारात पाहावयास मिळतो. मोकळ्या जागेत पिंपळवृक्ष लावल्यास पर्यावरणासाठी निश्चितच फायदा होईल. पिंपळ हा खास करून हळद्या, पोपट, मैना आदी पक्षांचा आवडता वृक्ष आहे.