शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

नौका विभागप्रमुखाला डावलले

By admin | Updated: July 29, 2016 00:48 IST

सागरी विभागातील अधिकाऱ्यांसाठी पोलिसांच्या नौका विभागाचे विशेष सुरक्षा प्रशिक्षण गोव्यात आयोजित करण्यात आले असताना त्या विभागाच्या पोलीस अधीक्षकांना डावलून

- जमीर काझी, मुंबई

सागरी विभागातील अधिकाऱ्यांसाठी पोलिसांच्या नौका विभागाचे विशेष सुरक्षा प्रशिक्षण गोव्यात आयोजित करण्यात आले असताना त्या विभागाच्या पोलीस अधीक्षकांना डावलून अन्य अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. मोटार ट्रान्सपोर्टच्या (एमटी) पुणे मुख्यालयातील विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी केलेल्या या नियुक्तीबाबत पूर्ण विभागात चर्चा आहे.गोव्यात गुरुवारपासून तीन दिवसांचे विशेष तांत्रिक प्रशिक्षण शिबिर सुरू झाले आहे. यामध्ये अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह दहा जणांना अद्ययावत माहिती दिली जाणार आहे. मात्र त्यासाठी एम.टी.च्या नौका विभागातील अधीक्षक निशिकांत मोरे यांनाच कळविण्यात आलेले नाही. त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेले पुण्यातील अधीक्षक प्रकाश आचरेकर यांना पाठविण्यात आले आहे.पोलीस दलातील अधिकारी व बंदोबस्तासाठी विविध प्रकारची वाहने, वाहक पुरविणे आणि त्या वाहनांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी मोटार परिवहन (एम.टी.) विभागावर आहे. २६/११ नंतर या विभागातही मोठ्या प्रमाणात वाहने व सामग्री घेण्यात आली आहे. सागरी किनाऱ्यावर गस्तीसाठी पाठविल्या जाणाऱ्या अद्ययावत बोटी व वाहनांची जबाबदारी हाताळण्यासाठी एम.टी.मध्ये कोकण परिक्षेत्रासाठी स्वतंत्र नौका विभाग कार्यरत आहे. या विभागातील अधिकारी व अंमलदारांना दरवर्षी सागरी सुरक्षेबाबत अद्यावत प्रशिक्षण दिले जाते. कर्तव्य बजावताना सुरक्षेच्या दृष्टीने घ्यायची काळजी, शत्रूंना प्रतिबंध करणे आदीबाबत त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाते. मात्र या प्रशिक्षण शिबिराकडे वरिष्ठ अधिकारी व प्रशासन किती सहजतेने पाहतात आणि त्यामध्ये वैयक्तिक लागेबांधे जपतात, हे एम.टी.च्या पोलीस नौका ‘रिफ्रेशर टेक्निकल ट्रेनिंग’च्या निमित्ताने समोर आले आहे. मे. गोवा शिपयार्ड कंपनीच्या वतीने २८ ते ३० जुलै दरम्यान हे सागरी घटकांतील अधिकाऱ्यांसाठी रिफ्रेशर टेक्निकल ट्रेनिंग’ होत आहे. नौका विभागाचे प्रमुख आणि गेल्या साडेतीन वर्षांपासून अधीक्षकपदाचा कार्यभार सांभाळत असलेल्या निशिकांत मोरे यांची त्यासाठी नियुक्ती होणे आवश्यक असताना त्यांना डावलण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी पुण्यातील अधीक्षक आचरेकर यांच्यासह एकूण दहा अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. एम.टी. विभागाचे प्रमुख व विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी २० जुलैला प्रशिक्षणासाठी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे. नौका विभागाला पूर्णपणे अंधारात ठेवून सागरी सुरक्षेसाठीच्या प्रशिक्षणासाठी अन्य कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्याच्या त्यांच्या या कृतीबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे. नौका विभागाच्या प्रशिक्षणासाठी आचरेकर यांनी इच्छा प्रदर्शित केल्याने त्यांना पाठविण्यात आले आहे. नौका विभागाचे अधीक्षक मोरे यांनी आपल्याला कळविले असते तर त्यांना पाठविले असते.- फत्तेसिंह पाटील (विशेष पोलीस महानिरीक्षक, एम.टी. पुणे)आपल्याला पूर्णपणे आंधारात ठेवून अधिकाऱ्यांची परस्पर निवड करण्यात आली आहे. नौका विभागासाठी ट्रेनिंग असताना त्यामध्ये कोणाच्या इच्छेवरून पाठविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यावरून वरिष्ठांना सागरी सुरक्षेचे गांभीर्य किती आहे, हे स्पष्ट होते. - निशिकांत मोरे (अधीक्षक, नौका विभाग, कोकण परिक्षेत्र, एमटी)