शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

BMC Election 2017 : विरोधी पक्षनेते पदावरून तिढा

By admin | Updated: March 7, 2017 21:38 IST

महापौरपदाबरोबरच विरोधी पक्ष नेते पदावरील हक्कही भाजपाने सोडल्यामुळे मुंबई महापालिकेपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 7 - महापौरपदाबरोबरच विरोधी पक्ष नेते पदावरील हक्कही भाजपाने सोडल्यामुळे मुंबई महापालिकेपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. दुस-या क्रमांकाच्या पक्षाशिवाय अन्य राजकीय पक्षाला विरोधी पक्षाचे स्थान देण्याबाबत महापालिका अधिनियमात कुठेही स्पष्टता नसल्याने चिटणीस खाते बुचकळ्यात पडले आहे. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते पद रिक्त राहण्याची शक्यता आहे. मिशन शंभर घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपाने शिवसेनेला बरोबरीत रोखले. मात्र सत्ता स्थापनेसाठी व महापौरपदासाठी आवश्यक आकडा गाठता न आल्याने भाजपाने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. एवढेच नव्हे तर महापौर किंवा कोणत्याही समितीच्या अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नाही, तसेच विरोधी पक्ष नेते पदही घेणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मात्र सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राजकीय पक्षाने सत्ता स्थापना केल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला विरोधी पक्ष म्हणून जाहीर करण्यात येते. तसेच त्या पक्षाचा गटनेता विरोधी पक्षनेता म्हणून ओळखला जातो. मात्र त्या पक्षाने विरोधी पक्षात बसण्यास नकार दिल्यास इतर कोणत्याही पक्षाला हे पद देण्याबाबत नियमात तरतूद नसल्याने महापालिकेत विरोधी पक्षनेते पदावरून कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी उद्या महापौर निवडणुकीनंतर नवनिर्वाचित महापौर आणि सर्व पक्षीय गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पण लेखी पत्र नाही. ... भाजपाने विरोधी पक्ष नेते पदावर दावा करणार नाही, असे जाहीर केले आहे. मात्र याबाबत अद्याप तसे पालिका चिटणीस विभागाला लेखी पत्र भाजपाने दिलेले नाही. हे पत्र आल्यानंतरच त्यावर कायदेशीर सल्ला घेता येणार आहे. कायद्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाव्यतिरिक्त अन्य कोणाला हे पद देता येत नसल्याने तिढा निर्माण झाला आहे. हा पेच सुटत नाही तोपर्यंत मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते पद हे रिक्त राहणार असल्याचे चिटणीस खात्यातील सुत्रांकडून समजते.निवडणुकीचा कार्यक्रम . 8 मार्चला जुन्या नगरसेवकांचा कालावधी संपत आहे. मात्र या दिवशी जुन्या नगरसेवकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. नव्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी कोकण आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या पावतीवर महापालिका मुख्यालयात व सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. नव्या नगरसेवकांना गेट नंबर 6 मधूनच प्रवेश दिला जाईल. महापौरांची निवडणूक झाल्यानंतर त्वरित नविन गट नेत्यांची, चार वैधानिक समित्यांच्या सदस्यांची घोषणा केली जाणार आहे. 14 मार्चला स्थायी व शिक्षण समितीची तर 16 मार्चला बेस्ट व सुधा समितीची निवडणूक होणार आहे.