शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुपारी देऊन ‘त्या’ युगुलाचा खून

By admin | Updated: October 29, 2014 00:39 IST

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीसह तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. ही घटना माहूर येथील रामगड किल्ल्यातील हत्ती दरवाज्याजवळ उघडकीस आली होती.

माहूरची घटना : दीड महिन्यानंतर छडा, पाच मारेकरी गजाआडमाहूर (यवतमाळ) : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीसह तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. ही घटना माहूर येथील रामगड किल्ल्यातील हत्ती दरवाज्याजवळ उघडकीस आली होती. मारेकऱ्यांनी कुठलाही पुरावा न सोडल्याने या प्रकरणाचा गुंता वाढत गेला. मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचलेच. दीड महिन्यानंतर घटनेचा छडा लागून पाच मारेकऱ्यांना अटक करण्यात यशस्वी झाले. हे दुहेरी हत्याकांड सुपारी घेऊन घडविल्याचे तपासात पुढे आले आहे.शाहरूख फिरोज खान पठाण रा. उमरखेड असे मृत तरुणाचे तर निलोफर बेग खालीद बेग रा. पुसद असे तरूणीचे नाव आहे. शाहरूख हा यवतमाळ येथे तर निलोफर ही पुसद येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. १० सप्टेंबरला पहाटे या दोघांचा येथील हत्ती दरवाजा परिसरात स्थानिक नागरिकांना छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आले होते. मात्र मारेकऱ्यांनी घटनास्थळी कुठलेही पुरावे सोडले नव्हते. त्यामुळे पोलिसांपुढे घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक परमजीतसिंह दहिया यांनी या दुहेरी हत्याकांडाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीधर पवार यांच्याकडे सोपविला. सुरूवातीला हा तपास कॉल डिटेल्सवर केंद्रित करण्यात आला. मात्र त्यातून काहीच हाती लागले नाही. अखेर पोलिसांनी गोपनीय माहितीकडे लक्ष केंद्रित केले. त्यामध्ये राजू ऊर्फ राजा रघुनाथ गाडेकर (२०) रा. कोलामपुरा माहूर याचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्याची घरझडती घेतली. त्यामध्ये निलोफरचा मोबाईल आढळून आला. मोबाईल हाती लागल्याने राजाचे बिंग फुटले. त्याने पोलिसांपुढे घटनेची कबुली दिली. त्यामध्ये गावातीलच रघु डॉन, जावेद पेंटर आणि त्यांच्या तीन साथिदारांच्या मदतीने सुपारी घेऊन हा खून केल्याची माहिती दिली. तसेच साथीदारांची नावेही उघड केली. त्यावरून पोलिसांनी राजू ऊर्फ राजा गाडेकर, शेख जावेद शेख हुसेन ऊर्फ पेंटर (३८), रंगराव शामराव बाबटकर (२५), शेषराव ऊर्फ पिंटू शामराव बाबटकर (१९), कृष्णा ऊर्फ बाबू मारोतराव शिंदे सर्व रा. माहूर यांना पोलिसांनी अटक केली. घरझडतीत रघु डॉन याच्या घरातून शाहरूखचा मोबाईल, पाकीटमधील विदेशी चलनी नोटा आढळून आल्या, त्या पोलिसांनी जप्त केल्या. तसेच घटनेत वापरलेला धारदार चाकू आणि कुऱ्हाडही मारेकऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे पोलिसातून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)-