शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

एडस झाल्याने प्रेयसीचा खून

By admin | Updated: March 6, 2017 03:44 IST

गोलमैदानात महिलेचा गळा चिरून हत्या करणाऱ्या प्रियकरला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे.

उल्हासनगर : गोलमैदानात महिलेचा गळा चिरून हत्या करणाऱ्या प्रियकरला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. पे्रयसीमुळे एड्सची लागण झाल्याच्या संतापातून खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. हा प्रियकर मूळचा पाकिस्तानचा आहे आणि व्हिसा संपूनही तो भारतात रहात होता. त्याची प्रेयसीही विवाहित आहे, पण पतीशी पटत नसल्याने वेगळी रहात होती. प्रियकराला पोलिसांनी अटक केल्याने आता माझे कुटुंब कसे जगेल, असा प्रश्न करत त्याने आपली अगतिकता व्यक्त केली. त्याला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.कॅम्प दोनमधील गोलमैदानात २७ मार्चला रात्री वंदना जगताप (वय २६) ही महिला गळा चिरलेल्या अवस्थेत सापडली होती. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मैदानात विरंगुळयासाठी आलेल्या महिला, मुले व पुरूषांत घबराट पसरली होती. गोलमैदान मिडटाऊन चौकीतील पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत तिला रूग्णवाहिकेतून मध्यवर्ती रूग्णालयात हलविले. पण डॉक्टरांनी तपासल्यावर तिला मृत घोषित केले. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शकील शेख यांनी चौकशीची सूत्रे हलविल्यावर प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले. प्रियकर पाकिस्तानातून कुटुंबासह भारतात आला आहे. सुरेशप्रेम शिजू (वय २८) असे त्याचे नाव आहे.एड्सची लागण झाल्याने आपण खंगूनखंगून मरणार. कुटुंबाचे कसे होईल? ही चिंता त्याला पोखरू लागली. जीवाच्या भीतीने पाकिस्तानातून पोट भरण्यासाठी भारतात आलो. १ मार्चला पासपोर्टची तारीख संपली. फक्त व्हिसा आहे. आता जगायचे कसे? जगता तरी येईल का, अशा अनेक प्रश्नांचे काहूर त्याच्या मनात उठले. त्यात वंदनाचा सतत पैशांचा तगादा सुरू होता. जिच्यामुळे एड्स झाला. तिच्यामुळे मी हकनाक मरणार. मग तिलाही का मारू नये, तिला संपवले पाहिजे. हे मनात धरून २७ मार्चला रात्री नऊ वाजता तिला त्याने गोलमैदानात बोलाविले. कोणताही मागचा-पुढचा विचार न करता, धारदार चाकूने तिचा गळा च्चिरून त्याने तेथून पळ काढला. पण तिच्याबद्दल माहिती गोळा केल्यावर पोलिसांना त्याची माहिती समजली आणि तो बेपत्ता असल्याचे लक्षात आले. तेव्हा माग काढत पोलिसांनी उल्हासनगर स्टेशनवरून त्याला शुक्रवारी अटक केली. तेव्हा त्याने हत्येचे कारण सांगितले. त्याला न्यायालयात हजर केल्यावर ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी दिली. (प्रतिनिधी)>प्रकृती बिघडल्याने उघड झाली लागणम्हारळ गावातील वंदना नवऱ्यापासून वेगळी रहात होती. तिला दहा वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा आहे. उल्हासनगरला ती कामानिमित्त येत असे. तेथे तिची ओळख रिक्षाचालक सुरेशप्रेमशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर ते तीन वर्षे पती-पत्नी म्हणून राहू लागले. वंदनाने पैशाचा तगादा लावल्याने दोघांत भांडणे होऊ लागली.सुरेशप्रेमची प्रकृती बिघडून लागल्याने त्याने डॉक्टरांकडे तपासणी केली. त्यात त्याला एचआव्हीची झाल्याचे स्पष्ट झाले. त्याने वंदनाकडे चौकशी केल्यावर तिला आधीच एड्स असल्याचे उघड झाले. तिच्यामुळे आपल्याला बाधा झाल्याने तो संतापला होता.