शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

महालक्ष्मी स्टील फॅक्टरीत स्फोट; एक ठार, पाच जखमी

By admin | Updated: October 14, 2014 00:56 IST

स्थानिक एमआयडीसीमधील महालक्ष्मी स्टील फॅक्टरीतील मेटल मेल्टींगच्या तप्त भट्टीत झालेल्या स्फोटात एक कामगार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. अन्य तिघे जखमी झाले.

एमआयडीसी : फरनेस-२ सेक्शनमधील घटनादेवळी (वर्धा) : स्थानिक एमआयडीसीमधील महालक्ष्मी स्टील फॅक्टरीतील मेटल मेल्टींगच्या तप्त भट्टीत झालेल्या स्फोटात एक कामगार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. अन्य तिघे जखमी झाले. प्लान्टच्या फरनेस-२ सेक्शनमध्ये सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमीला नागपूर येथे हलविण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे.सकाळच्या पाळीत प्लान्टमध्ये १५ मीटर बाय २४ मीटर रूंदीच्या तप्त भट्टीत लोखंडी स्क्रॉब टाकून तप्त लोह रस तयार करण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात भट्टीतील तापलेले लोखंडाचे तुकडे आणि लोह रस दूरवर उंच उडाल्यामुळे लिफ्ट तयार करणाऱ्या क्रेनवर काम करणारा कुशल कामगार शारदाप्रसाद शंभुप्रसाद दुबे (२६) रा. चेकपूर्वा जि. आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश हा खाली असलेल्या ३३ के.व्ही. च्या विद्युत ट्रान्सफॉर्मरवर पडून जागीच ठार झाला. हा कामगार क्रेनच्या ७५ फूट उंचीवर काम करीत होता. ट्रान्सफॉर्मरमधील विद्युत करंट व भट्टीतून उडालेल्या तप्त लोह रसामुळे तो गंभीररीत्या भाजला गेला. तसेच रामकुमार दरोगा यादव (३०) रा. ब्रह्मपुरा परसा जि. सारंग, बिहार हा कामगार तप्त भट्टीच्या स्फोटामुळे ६० टक्के भाजून गंभीर जखमी झाला. तसेच विश्वनाथ यादव रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश, उमेश मेहतो व इंद्रजीत राय दोघेही रा. छपरा बिहार हे सुद्धा जखमी झाले आहेत.या फॅक्टरीमध्ये पुलगाव सीएडी कॅम्प मधील लोखंडी स्कॉबचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या स्कॉबसोबत एखाद्या स्फोटक वस्तूचा तुकडा आल्यामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारचे अपघात या फॅक्टरीत नेहमीचेच झाले आहेत. मात्र त्यावर पडदा टाकण्याचे काम व्यवस्थापन करीत असल्याचा आरोप होत आहे. तीन पाळ्यांमध्ये काम होत असलेल्या या फॅक्टरीत ९०० कुशल व अकुशल कामगार करतात असे कंपनीचे अध्यक्ष आर.एस. लढ्ढा यांनी सांगितले. कामगार अ‍ॅक्टच्या नियमांचे कुठेही पालन होत नसल्यामुळेच ही घटना घडली असावी, अशीही चर्चा आहे. यापूर्वीही या फॅक्टरीत अनेक कामगारांचा जीव गेला असल्याचा आरोप होत आहे.(प्रतिनिधी)