शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

किशोरवयीन मुलीला ब्लॅकमेल करून अडीच किलो सोने हडपले!

By admin | Updated: January 20, 2017 02:48 IST

पीडितेचे शारीरिक शोषणही केले; मोठय़ा भावासह आईने दिली आरोपी युवकाची साथ.

मूर्तिजापूर, दि. १९- शहरातील एका अल्पवयीन युवतीला प्रेमाच्या जाळ्य़ात ओढून तिचे शारीरिक शोषण केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी युवकाच्या भावासह त्याच्या आईने या कामी त्याची साथ दिली असून, युवतीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून अडीच किलो सोने हडपले आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये मागील आठवड्यात गुन्हा दाखल केला आहे.न्यायालयात हजर केले असाता आरोपिांना न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलस कोठडी सुणावली आहे.मूर्तिजापूर शहरातील एका १७ वर्षीय युवतीची मनीष शर्मा नामक युवकाशी ओळख झाली. युवतीची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याची बाब हेरून मनीषने तिला आपल्या प्रेम जाळ्य़ात ओढले आणि तिचे शारीरिक शोषणही केले. काही दिवसांनी मनीषने त्या युवतीला घरून रोख रक्कम व दागिने आणण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतर काही आक्षेपार्ह छायाचित्रे इंटरनेटच्या माध्यमातून प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यामुळे, युवतीने भीतीपोटी रोख रक्कम व दागिने मनीषला आणून दिले. मनीषची लालसा वाढत गेल्याने त्याने आणखी पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. युवतीने नकार देण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी युवकाचा मोठा भाऊ आणि आईनेही बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे, सदर अल्पवयीन मुलीने अनेक वेळा रोख रक्कम व जवळपास अडीच किलो सोने मनीषला आणून दिले. हा प्रकार सुरूच राहिल्याने कंटाळलेल्या अल्पवयीन युवतीने अखेर ही बाब जवळच्या नातेवाइकांना सांगितली. त्यानंतर नातेवाइकांनी पोलिसात फिर्याद दिली. विविध कलमान्वये गुन्हा अल्पवयीन युवतीचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी मनीष शर्मा विरुद्ध भादंविच्या कलम ३७६, बाल लैंगिक संरक्षण अधिनियम (पॉस्को) अंतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ब्लॅकमेलिंग करून फसवणूक केल्याप्रकरणी मनीषसह त्याचा भाऊ व आईविरुद्धही मूर्तिजापूर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार गजानन पडघन करीत आहेत. दोन आरोपींना पोलीस कोठडी या प्रकरणात मनीष व त्याच्या भावाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मनीषच्या आईला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.सोने खरेदी करणारा सराफाही गजाआड ब्लॅकमेल करणार्‍या मनीषक डून अवैधरित्या सोने खरेदी करणार्‍या वाकोडे नामक सराफा व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पीडित युवतीचे बयान नोंदवले!शारीरिक शोषण झालेली युवती अल्पवयीन असल्याने या प्रकरणात महिला व बाल कल्याण समितीने बयान नोंदवले आहे.