शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

चुकीची माहिती देणाऱ्या कंपन्या काळ्या यादीत; आयआयटीची कारवाई

By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST

उत्तम शिक्षण आणि चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवून देणाऱ्या आयआयटी मुंबईची नऊ कंपन्यांनी फसवणूक केली

मुंबई : उत्तम शिक्षण आणि चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवून देणाऱ्या आयआयटी मुंबईची नऊ कंपन्यांनी फसवणूक केली आहे. खोट्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या या कंपन्यांना आयआयटी मुंबईने काळ््या यादीत टाकले आहे.आयआयटी मुंबईत दरवर्षी विविध अभ्यासक्रमाचे धडे घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी अनेक कंपन्यांकडून प्लेसमेंटची आॅफर देण्यात येते. मात्र, यंदा त्यामध्ये फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या आॅफर्स येऊनही प्रत्यक्षात नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचे पुढचे पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे  अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात आली असता, काही कंपन्या बोगस असल्याचे समोर आले.आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या ९ ब्लॅक लिस्टेड कंपन्याची यादी जाहीर केली आहे. यात ‘लिग्रेड बर्नेट ग्रुप’, ‘जीपीएसके’, ‘जॉन्सन इल्ट्रीक चाईना’, ‘पोर्टल मेडिकल’, ‘पेपरटॅप’, ‘कॅशकेअर टेक्नॉलॉजीस’, ‘लेक्सइनोव्हा’ आणि ‘इंडसइनसाइट’ या कंपन्याचा समावेश आहे. या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यात आले होते. मात्र, ते प्लेसमेंट अचानक रद्द करण्यात आले. विशेष म्हणजे यातील काही कंपन्यांचे पत्ते आणि इतर माहिती चुकीची आहे, तर काही कंपन्यांनी प्लेसमेंट दिली नसून, विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवले आहे. (प्रतिनिधी)