शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
4
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
5
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
6
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
7
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
8
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
9
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
10
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
11
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
12
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
13
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
14
Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!
15
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
16
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
17
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
18
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
19
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
20
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

भाजपाचे ‘चला जिंकूूू या महाराष्ट्र’

By admin | Updated: January 12, 2017 06:51 IST

भाजपाकडून महापालिका निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चेचे निमंत्रण शिवसेनेकडे आज गेले

अजित मांडके / ठाणे भाजपाकडून महापालिका निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चेचे निमंत्रण शिवसेनेकडे आज गेले असतानाच उद्या (गुरुवारी) ठाण्यात होणाऱ्या भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे घोषवाक्य ‘चला जिंकूया महाराष्ट्र’ हे आहे. त्यामुळे स्वबळावर महाराष्ट्रातील या मिनी-विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याचा भाजपाचा इरादा पक्का असल्याचेच संकेत प्राप्त झाले आहेत.ठाण्यासाठीचे घोषवाक्य हेही चला जिंकूया महानगरपालिका, हे आहे. शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी तीनतीन नेते जागावाटपाच्या वाटाघाटी करतील, असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार जाहीर करीत असताना पक्षाचे प्रवक्ते आ. राम कदम हे मुंबईत भाजपाची ताकद जास्त असून त्या तुलनेत भाजपाला जागा मिळाल्या पाहिजेत, असे सांगत होते. मुंबई, ठाणे या शिवसेनेचा वरचष्मा असलेल्या शहरांमधील नागरी सुविधांची वानवा, यावर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत राम कदम व अन्य काही नेते बोट ठेवण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात २१ तारखेला होणाऱ्या महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक तब्बल १० वर्षांनंतर ठाण्यात आयोजित केली आहे. ठाणे महापालिकेत सध्या भाजपाचे केवळ ८ नगरसेवक आहेत. परंतु, आता आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. कल्याण-डोंबिवलीत स्वबळावर लढल्यामुळे भाजपाला फायदा झाला. निवडणुकीपूर्वी ९ जागांवर असलेल्या भाजपाने ४२ जागांवर मजल मारली. दरम्यान, सकाळी ९ वाजता प्रथम जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीतच युतीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर, यासंदर्भातील प्रस्ताव प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. सकाळी ११ वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीस ३५० हून अधिक निमंत्रित हजेरी लावणार आहेत. समारोपाचे सत्र हे सर्वांसाठी खुले असून मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने बैठकीचा समारोप होणार आहे. यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित असतील.सर्व मंत्र्यांना मामलेदारची चमचमीत मिसळटिपटॉप येथे होणाऱ्या या बैठकीनिमित्त लज्जतदार जेवणावळी उठवण्यात येणार आहेत. जेवणात पंचपक्वान्नाचा थाट असून उपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांना ठाणे शहर भाजपाकडून मामलेदारची चमचमीत मिसळ खाऊ घातली जाणार आहे. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतील काही दिग्गज पदाधिकारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.