शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मतविभागणीचा फायदा- शरद पवार

By admin | Updated: March 12, 2017 09:08 IST

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मतविभागणीचा फायदा झाला.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 12 - उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मतविभागणीचा फायदा झाला. भाजपाविरोधात समाजवादी पक्ष व काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि अजितसिंगांचा पक्ष वेगळे लढल्यानं साहजिकच त्याचा लाभ भाजपाला झाल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. भाजपा आणि पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे लक्ष्य केंद्रित केलं होतं. पंतप्रधानांनी एका राज्यात सत्ता आणण्यासाठी एवढे प्रयत्न केल्याचे पहिल्यांदाच पाहायला मिळाले. पाच राज्याच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस, बहुजन समाज पक्ष व अजितसिंगांचा पक्ष हे भाजपाविरोधात निवडणूक लढवत होते. त्यामुळे साहजिकच मतविभागणीचा लाभ उत्तर प्रदेशात भाजपाला झाला. उत्तर प्रदेशमध्ये असा निकाल लागेल, हे अपेक्षित होते. तसेच भाजपाला आता उत्तर प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांनी विकासाकडे अधिक लक्ष केंद्रित करावे, अशी तेथील लोकांची भाजपाकडून अपेक्षा असेल. मुंबई व अन्य ठिकाणी उत्तर भारतीयांचं होत असलेलं स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. स्थलांतर रोखण्यासाठी तेथेच विकासात्मक कामे केली पाहिजेत. पंजाबमध्ये अकाली दल-भाजपा गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत होते. लोकांनी यंदा त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून काँग्रेसच्या हाती सत्ता सोपवली आहे. काँग्रेस या विजयाबद्दल अभिनंदनास पात्र आहे. पंजाब हे सीमेवरचे राज्य असल्यानं देशात अन्नधान्य पुरवठ्याच्या बाबतीत ते महत्त्वाची कामगिरी करते, तसेच सीमाही लागून असल्यानं त्याच्या रक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे राज्य आहे. पंजाबी लोकांच्या अपेक्षा काँग्रेसला पूर्ण कराव्या लागतील, असेही पवार म्हणाले आहेत. मणिपूर आणि गोवा राज्यांतील अंतिम निकाल काँग्रेस आणि भाजपाच्या जवळपास समसमान आहेत. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही. परंतु गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री निवडणुकीत तेथे तळ ठोकून असताना काँग्रेसने मिळवलेला विजय हा डोळेझाक करण्यासारखा नाही, असे पवार म्हणाले. गोव्यात आणि उत्तराखंडमधल्या मुख्यमंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मणिपूरमध्ये भाजपा अजिबात नसताना भाजपने तेथे मिळवलेले यश अवर्णनीय असल्याचे पवार म्हणाले. उत्तराखंडचा विजय हा भाजपाला स्पष्ट बहुमत देणारा असल्याचे पवारांनी सांगितलं आहे.