शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात भाजपाची आगामी रणनीती ‘मिशन मुख्यमंत्री’!

By admin | Updated: May 14, 2014 04:50 IST

भारतीय जनता पार्टीच्या विस्तारित प्रदेश कार्यकारिणीची बैठक बुधवारी मुंबईत होत आहे. बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या आढाव्याबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या तयारीची चर्चा करण्यात येणार आहे.

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या विस्तारित प्रदेश कार्यकारिणीची बैठक बुधवारी मुंबईत होत आहे. बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या आढाव्याबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या तयारीची चर्चा करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते खा. गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. या वेळी पक्षाचे खासदार, आमदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत़ केंद्रामध्ये एनडीएची सत्ता येणार असल्याच्या अंदाजाने भाजपात उत्साहाचे वातावरण आहे. संभाव्य मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातून कोण कोण मंत्री होणार याचीदेखील आता चर्चा सुरू झाली आहे. पाच महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठीची रणनीती आखली जाणार आहे. युतीमध्ये शिवसेना ही भाजपापेक्षा कितीतरी जास्त जागा लढविते. तथापि भाजपाने मिशन मुख्यमंत्री असे लक्ष्य समोर ठेवले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आपण मुख्यमंत्री म्हणूनच परत येऊ, अशी घोषणा गोपीनाथ मुंडे यांनी आधीच केली आहे. ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे युतीमध्ये आधीपासूनच ठरलेले आहे. त्यामुळे या वेळी गेल्या वेळपेक्षा जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल; आणि त्यानंतर शिवसेनेपेक्षा जास्त जागा निवडून याव्यात, असेही भाजपाचे लक्ष्य असेल, अशी माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली. भाजपाच्या मिशन मुख्यमंत्री या मोहिमेकडे शिवसेना कसे पाहते, हेही महत्त्वाचे ठरेल. संख्याबळाअभावी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद हातून गेल्याची सल अजूनही सेनेत आहे. (विशेष प्र्रतिनिधी)