शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये भाजपाची सत्ता

By admin | Updated: May 27, 2017 02:42 IST

पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने बाजी मारत कमळ फु लवले आहे. २० प्रभागांतील ७८ जागांसाठी

वैभव गायकर । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने बाजी मारत कमळ फु लवले आहे. २० प्रभागांतील ७८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या ५१ जागा निवडून आल्याने, पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाचा भगवा पालिकेवर फडकला आहे. २४ मे रोजी झालेल्या मतदानानंतर २६ मे रोजी प्रभागनिहाय निवडणूक निर्णयासाठी, अधिकाऱ्यांच्या एकूण सहा कार्यालयांत ही मजमोजणी पार पडली.रायगड जिल्ह्यातील पनवेल ही पहिली महानगरपालिका असून, १ आॅक्टोबर २०१६ रोजी या महानगरपालिकेची स्थापना झाली. २९ महसुली गावांसह सिडकोचे सहा नोड आदींचा या पालिकेत समावेश आहे. २४ मे रोजी पार पडलेल्या मतदानाची टक्केवारी ५५ टक्केपर्यंत गेली होती. विशेष म्हणजे, भाजपाने अगदी नियोजनबद्ध पद्धतीने ही निवडणूक लढविली. जाहिरातबाजी ते मंत्र्यांच्या चौक सभांमुळे भाजपाने पनवेलच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील खारघर व पनवेलमध्ये दोन सभा घेतल्या होत्या. पनवेल महानगरपालिकेला खारघर शहरातून सर्वात जास्त विरोध झाला होता. शेकापची सत्ता असलेली तत्कालीन खारघर ग्रामपंचायत खारघरमधील संघटनांना एकत्र घेऊन, पालिकेविरोधात उच्च न्यायालयातदेखील गेली होती. मात्र, खारघरवासीयांनी तीन प्रभागांतून सर्वच १२ जागांवर भाजपाला कौल दिल्याने, खारघरमध्ये शेकापला मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागातील प्रभाग सोडले, तर शहरी भागातील मतदारांवर आजही मोदींचा करिश्मा कायम असल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्र मांक १, २, ३ मध्ये शेकाप महाआघाडीने विजय संपादन के ला. हे तीनही प्रभाग ग्रामीण भागात मोडतात.विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीत उतरलेल्या भाजपाला मतदारांनी कौल दिल्याचे दिसून आले. मात्र, शेकाप आघाडीने आरोप-प्रत्यारोप करून निवडणुका लढविल्याने जनतेने शेकापला नाकारल्याचे दिसून येत आहे. शेकापला २३, काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी २ अशा महाआघाडीला २७ जागा मिळाल्या. मात्र, सेनेला पनवेलमध्ये खाते खोलता आले नाही.सेनेला आत्मपरीक्षणाची गरज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होऊनदेखील सेनेला पनवेलमध्ये खाते खोलता न आल्याने, आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. पनवेलमध्ये सेनेची बांधणी योग्यरीत्या झालेली नाही, तसेच निवडणुकीपूर्वीच पक्षाचे तालुका प्रमुख वासुदेव घरत यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला असल्याने, सेना बॅक फूटवर गेली असल्याचे या वेळी स्पष्ट झाले होते. मंत्री एकनाथ शिंदे, सचिव आदेश बांदेकर यांनीदेखील निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. पनवेलचे राजकारण माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील या नेत्यांभोवती फिरत आले आहे. आता भाजपाने एकहाती सत्ता मिळविल्याने, माजी आमदार विवेक पाटील यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जाते. आरपीआयचा दोन्ही जागांवर विजयपनवेल महानगर पालिकेत भाजपाच्या सोबतीला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाने युती केली होती. ७८ पैकी दोन जागेवर भाजपाच्या चिन्हावर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड व त्यांची बहीण विद्या गायकवाड दोघेही विजयी झाल्याने, आरपीआयने पनवेल महानगरपालिकेत आपले खाते उघडले आहे.