शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

‘एमएमआरडीए’वर भाजपाचे शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: October 11, 2015 04:45 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो २ आणि ७ या प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमानंतर

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो २ आणि ७ या प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमानंतर वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सायंकाळी ५.३0 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले असून, या भूमिपूजन समारंभानिमित्त भाजपाने मुंबईत भव्य शक्तिप्रदर्शन आयोजित केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमासाठी भव्य स्टेजसह जय्यत तयारी केली असून, याचा खर्च एमएमआरडीएने केला आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच मंजुरी मिळालेल्या दहिसर ते डी.एन. नगर आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यापूर्वी हा कार्यक्रम ४ आॅक्टोबर रोजी होणार होता. अखेर ११ आॅक्टोबरला या प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीएने जय्यत तयारी केली असून, एमएमआरडीए मैदानात याचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भूमिपूजन सोहळ्याचे रूपांतर भाजपाच्या सभेत होणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.मेट्रो भूमिपूजनानंतर होणाऱ्या सभेसाठी मुंबई भाजपाने जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक आमदार आणि खासदाराने सभेला उपस्थित राहण्यासाठी आपल्या मतदारसंघात बॅनरबाजी केली आहे; तसेच प्रत्येक पदाधिकाऱ्यालाही या सभेला गर्दी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एमएमआरडीए मैदानावर रविवारी भाजपाचे शक्तिप्रदर्शन पाहण्यास मिळणार आहे. एमएमआरडीएच्या मैदानावर राजकीय सभांसाठी शुल्क आकारण्यात येते. परंतु मेट्रोचा कार्यक्रम या मैदानावर आयोजित करत भाजपाने प्राधिकरणाच्या पैशातून स्वत:चे शक्तिप्रदर्शन घडवून आणल्याची चर्चा रंगली आहे. (प्रतिनिधी)