शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी भाजपाच्या मुक्ता टिळक यांना पसंती ?

By admin | Updated: March 6, 2017 02:09 IST

महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे.

पुणे : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. तर सभागृह नेतेपदासाठी श्रीनाथ भिमाले यांचे नाव आघाडीवर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाचे निरीक्षक सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाची मते स्वतंत्रपणे जाणून घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना त्याचा अहवाल सादर केला जाणार असून, त्यांच्याकडून नावांची अंतिम घोषणा होईल.महापालिकेत भाजपाचे ९८ नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक रविवारी सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, माधुरी मिसाळ उपस्थित होते. या बैठकीमध्ये नूतन नगरसेवकांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर गटनेता निवडीचे अधिकार मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना देण्यात आले. त्याचबरोबर महापौर व उपमहापौरपदासाठी कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत सर्व नगरसेवकांचा स्वतंत्रपणे कौल जाणून घेण्यात आला. महापालिकेचे महापौर यंदा सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव झाले आहे. सत्तेवर आलेल्या भाजपाकडून ४८ नगरसेविका निवडून आल्या आहेत. महापौर पदासाठी महापालिकेच्या सभागृहामध्ये ८४ महिला उमेदवारांनी विजयश्री संपादन करून प्रवेश केला आहे. त्यामध्ये भाजपाकडून ४८ नगरसेविका निवडून आल्या आहेत, त्यापैकी महापौर पदासाठी माजी गटनेत्या मुक्ता टिळक, मानसी देशपांडे, रंजना टिळेकर, वर्षा तापकिर, रेश्मा भोसले, माधुरी सहस्त्रबुध्दे, मंजुश्री नागपुरे, निलिमा खाडे आदी नगरसेविकांची नावे चर्चेत होती. त्यापैकी चौथ्यांदा निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सभागृह नेते पदासाठी श्रीनाथ भिमाले यांचे नाव आघाडीवर आहे. (प्रतिनिधी)।१५ मार्चला निवडणूकमहापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक १५ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. जिल्हाधकारी सौरभ राव या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यासाठी ८ मार्च रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्यापूर्वी पक्षाचा गटनेता व नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी नगरसेवकांची बैठक घेऊन ठराव मंजूर करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. उपमहापौरपद रिपाइंकडेभाजपाकडून उपमहापौरपद रिपाइंसाठी सोडण्याचा विचार करण्यात येत आहे. रिपाइंच्या उमेदवारांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या होत्या. रिपाइंला ५ जागा मिळालेल्या आहेत. महापालिकेत स्पष्ट बहुमत प्राप्त मिळाल्यानंतर भाजपाला महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष आदी महत्त्वाची सत्तास्थाने मिळणार आहेत. त्यामुळे उपमहापौर युतीमधील रिपाइंला देण्याचा विचार सुरू आहे.