शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वरळीत भाजपाची फिल्डिंग

By admin | Updated: January 21, 2017 02:53 IST

वरळीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार फिल्डिंग लावली आहे.

चेतन ननावरे,

मुंबई- वरळीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर चार हजारांहून अधिक मतदारांना आधारचे स्मार्टकार्ड मोफत वितरित करून भाजपाने संपर्काचा नवा फंडा वापरला आहे.केवळ निवडणुका आहेत, म्हणून हा उपक्रम घेतला नसल्याचे भाजपाचे वडाळा विधानसभा सचिव राजेंद्र (राजन) डेरवणकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, स्मार्टकार्डसाठी ठिकठिकाणी वेगवेगळे दर आकारले जातात. बहुतांश लोकांना स्मार्टकार्डची माहिती नसून काही ठिकाणी तळागाळातील नागरिकांची आर्थिक लूटही केली जाते. त्यामुळे स्मार्टकार्डची माहिती, उपयोग आणि लाभ मिळवून देण्याची मागणी विभागातील नागरिकांकडून होत होती. त्यामुळे मोफत स्मार्टकार्ड काढून देण्याचा उपक्रम राबवला. आश्चर्याची बाब म्हणजे सुमारे हजार नागरिकांनी या उपक्रमाची मागणी केली होती. मात्र चार हजारांहून अधिक नागरिकांनी याचा फायदा घेतला.स्मार्टकार्डशिवाय भाजपाने विभागातील तरुण, महिला आणि विद्यार्थ्यांसाठीही वेगवेगळे उपक्रम राबविल्याचा दावा डेरवणकर यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात, चाय के साथ’ उपक्रम, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त कापडी पिशव्या वाटप, हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आणि स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम वरळीत याआधीही स्वत: राबवले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे दहीहंडी सणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लादल्यानंतर नियमांचे पालन करणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन यशस्वीरीत्या करून दाखवले होते. त्यामुळे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबवलेला नाही, तर याआधीही सातत्याने वरळीत उपक्रम राबवल्याचे डेरवणकर यांनी सांगितले.>पक्षबांधणी महत्त्वाची!केवळ एक उपक्रम घेऊन मतदारांशी संपर्क साधता येत नाही, असेही डेरवणकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या १७ वर्षांपासून या ठिकाणी पक्षबांधणी करत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या वेळोवेळी बैठका घेत आहे. शिवाय भाजपा सरकारच्या केंद्र आणि राज्यातील योजना विभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.>अन्य पक्षही सरसावलेभाजपाने मतदारांना गाठण्याची लढवलेली शक्कल पाहून अन्य पक्षीय नेत्यांनीही या प्रभागात कामांचा धडाका सुरू केला आहे. यापुढच्या काही दिवसांमध्ये पक्षीय कामांची गती अधिक सुरू राहणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. या प्रभागातील नागरी समस्यांचे मुद्दे करण्यासाठीही पक्षांमध्ये चढाओढ सुरू झालेली आहे.