शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी दिवे लावण्याचे भाजपाचे स्वप्न भंगले...

By admin | Updated: September 25, 2016 06:00 IST

मुंबईत एलईडी दिवे बसवण्याचे स्वप्न भंग झाल्यानंतर, बेस्टमार्फत प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपाला, शिवसेनेने शह दिला आहे. कुलाबा, कफ परेड ते माहीम

मुंबई : मुंबईत एलईडी दिवे बसवण्याचे स्वप्न भंग झाल्यानंतर, बेस्टमार्फत प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपाला, शिवसेनेने शह दिला आहे. कुलाबा, कफ परेड ते माहीम-सायन एलईडी दिवे बसवण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये शिवसेना व विरोधी पक्षाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाच्या माध्यमातून भाजपा आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे.मरिन ड्राइव्हवर पिवळे दिवे बदलून, पांढरे दिवे बसवण्याचा भाजपाच्या प्रकल्पाला मित्रपक्ष शिवसेनेनेच सुरुंग लावला होता. भाजपानेही हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत, शिवसेनेवर तोफ डागली होती. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामध्ये ट्विटर युद्ध रंगले होते. मात्र, न्यायालयातूनच दट्ट्या पडल्यानंतर, मरिन ड्राइव्हवरील पांढरे दिवे उतरविले होते. मात्र, भाजपाचा पांढऱ्या दिव्यांचा शौक काही संपलेला नाही. भाजपाच्या अधिपत्याखाली असलेल्या बेस्टच्या माध्यमातून, मुंबईतील ४,००० दिवे बदलून एलईडी दिवे बसवण्याचा प्रस्ताव आणण्यात आला. (प्रतिनिधी)एलईडी ठरतील खर्चीक3.45 कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. मात्र, हा प्रस्तावही मित्रपक्ष आणि विरोधकांनी बहुमताच्या जोरावर फेटाळल्याने, भाजपाला दणका बसला आहे. उपक्रम कर्जबाजारी असताना, असे दिवे लावणे खर्चीक ठरेल, असा मुद्दा शिवसेनेचे सुनील गणाचार्य यांनी उपस्थित केला. या प्रकल्पासाठी पालिका आर्थिक तरतूद करीत असल्यास, समितीला काही हरकत नाही, अशी भूमिका सदस्यांनी घेतली. प्रशासनाच्या माध्यमातून साकार होईल स्वप्न : सत्ताधारी आणि विरोधकांनी कोंडी केली, तरी बेस्ट प्रशासनाच्या माध्यमातून आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात भाजपा आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनामार्फत हा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडे पाठवून, आर्थिक मदत मागण्यात येणार आहे.