शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

‘दुबई’ वॉर्डात आघाडीला भाजपाचे आव्हान

By admin | Updated: February 4, 2017 21:48 IST

आघाडीसह भाजपाकडूनही तीन मुस्लीम उमेदवार रिंगणात

नाशिक : मुख्य जुने नाशिक असलेल्या प्रभाग १४ अर्थात ‘दुबई वॉर्ड’मधून कॉँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा लढविणार आहे. आघाडीने या प्रभागातून एकूण तीन मुस्लीम उमेदवार दिले असून, भाजपानेदेखील या उमेदवारांचे प्रतिस्पर्धी म्हणून तीन मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत.मागील पंचवार्षिकमध्येही दुबई वॉर्डातून आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आले होते. एकूणच द्विसदस्सीय प्रभाग पद्धतीने त्यावेळी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या दुबई वॉर्डात कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले होते. यंदा पुन्हा बहुसदस्स्यीय प्रभाग रचनेनुसार होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी-कॉँग्रेसची आघाडी झाली आहे. कॉँग्रेसने दोन जागा लढविण्याचे निश्चित केले आहे. विद्यमान नगरसेवक सुफी जीन यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी कॉँग्रेस सर्वसाधारण गटातून एकमेव जागा लढविणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ज्या पद्धतीने समान जागावाटप आघाडीकडून करण्यात आले होते. त्याचप्रमाणे यंदाही आघाडीकडून समान जागावाटप करण्यात आल्या आहेत. कॉँग्रेसने दोन जागांवर महिला उमेदवार तर राष्ट्रवादीने दोन जागांवर एक महिला एक पुरुष उमेदवार दिले आहेत. कॉँग्रेसने विद्यमान नगरसेवक समीना मेमन यांना पुन्हा संधी दिली असून, दुसऱ्या जागेवरून कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी शेख हनीफ बशीर यांच्या मातोश्री शहानूर शेख यांना कॉँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीने संजय साबळे यांच्या पत्नी शोभा साबळे यांना तिकिट दिले असून, विद्यमान अपक्ष नगरसेवक साबळे यांना तिकीट नाकारण्यात आले आहे.