शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लातूर मनपात काँंग्रेस तर गातेगाव पंचायत समिती गणात भाजप विजयी

By admin | Updated: August 29, 2016 13:35 IST

लातूर महानगर पालिका प्रभाग क्रमांक २ (अ) आणि लातूर पंचायत समिती गातेगाव गणासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला.

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. २९ -  लातूर  महानगर पालिका प्रभाग क्रमांक २ (अ) आणि लातूर पंचायत समिती गातेगाव गणासाठी रविवारी  पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाला असून, मनपात काँग्रसेचे रमेशसिंह बिसेन ७३६ मतांनी विजयी झाले आहेत. तर पंचायत समिती गातेगाव गणात भाजपाचे ज्ञानेश्वर जुगल १४० मतांनी विजयी झाले आहेत.मनपाच्या प्रभाग क्रमांक २ (अ) चे माजी महापौर अख्तर शेख यांचे जात प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समितीने रद्द केले होते. त्यामुळे या रिक्त जागेवर रविवारी पोटनिवडणूक झाली. सोमवारी सकाळी १० वाजता मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मतमोजणी झाली. यावेळी काँग्रेसचे रमेशसिंह बिसेन यांना सर्वाधिक २ हजार १०३ मते मिळाली. भाजपाचे हमीद बागवान यांना १ हजार ३६७ मते मिळाली. राष्ट्रवादीचे अन्वर कुरेशी यांना २१० तर महाराष्ट्र विकास आघाडीचे अ‍ॅड़  गोपाळ बुरबुरे यांच्या पारड्यात २२८ मते पडली. अपक्ष उमेदवार शिरिष देवकत्ते यांना केवळ १६ मते पडली असून, ३३ नकारार्थी मतदान झाले आहे. तथापि, काँग्रसेचे रमेशसिंह बिसेन ७३६ मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी घोषित केले.लातूर पंचायत समिती गातेगाव गणाचे सदस्य बाळासाहेब कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीत एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. त्यात भारतीय जनता पार्टीचे ज्ञानेश्वर संभाजी जुगल यांनी सर्वाधिक २ हजार ९३४ मते घेतली आहेत. ते १४० मतांच्या फरकाने विजयी झाले असून, काँग्रेसच्या उमदेवार सुनिता बाळासाहेब कदम यांना २ हजार ७९४ मते मिळाली आहेत. शिवसेनेचे महादेव सुरेश काळे यांना २६६, राष्ट्रवादीचे विशाल विजयकुमार वाघमोडे यांना १७१ मते मिळाली आहेत. या निवडणुकीतही ५१ मतदारांनी नकारार्थी मतदान हक्क बजावला आहे.