शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेनेचे हे बोक्यांचे भांडण

By admin | Updated: February 18, 2017 03:33 IST

भाजपा-शिवसेनेचे भांडण हे दोन बोक्यांचे भांडण असून, ते सत्तेच्या लोण्याचा गोळा खाण्यासाठी आहे. २३ फेब्रुवारीनंतर ‘आपण दोघे मिळून खाऊ

पुणे : भाजपा-शिवसेनेचे भांडण हे दोन बोक्यांचे भांडण असून, ते सत्तेच्या लोण्याचा गोळा खाण्यासाठी आहे. २३ फेब्रुवारीनंतर ‘आपण दोघे मिळून खाऊ’ अशी भाजपा व शिवसेनेची भूमिका असेल, अशी टीका प्रदेश काँगेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने बोपोडी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार हुसेन दलवाई, आमदार शरद रणपिसे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, पुणे शहर व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, गोपाल तिवारी, संजय बालगुडे, एनएसयूआयचे अध्यक्ष अमीन शेख, मनीष आनंद, काका धर्मावत, दत्ता गायकवाड, निर्मला छाजेड, आनंद छाजेड, संगीता गायकवाड, सोनाली गायकवाड, मारुतराव गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ‘‘भाजपा- शिवसेनेचे भांडण हे दिखाऊपणाचे नाटक आहे. ज्यांना भाजपाला मतदान करायचे नाही, त्यांनी शिवसेनेला मतदान करा आणि ज्यांना शिवसेनेला मतदान करयचे नाही, त्यांनी भाजपाला मतदान करायचे, यासाठी हे भांडण आहे.’’ शिवसेनेचा मराठी बाणा कुठे गेला? असा सवाल करून एवढी बिकट अवस्था शिवसेनेची यापूर्वी कधीच झाली नव्हती, भाजपाच्या मागे ते फरफटत जात आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली. शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते ‘खिशात राजीनाम घेऊन फिरतो’ असे सांगतात; मात्र गेटच्या आत जात नाहीत. ‘इस्तिफा देंगे मगर तारीख नहीं बतायेंगे’ अशी अवस्था शिवसेनेची झाल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी खासदार हुसेन दलवाई, राधाकृष्ण विखे-पाटील, डॉ. विश्वजित कदम यांचीही भाषणे झाली. (प्रतिनिधी)