शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेसाठी भाजपा ‘सैराट’

By admin | Updated: September 5, 2016 02:10 IST

महानगरपालिका निवडणुकीला अजून सहा महिने शिल्लक असले तरी भाजपाची पालिका निवडणुकीची तयारी सध्या सैराट सुरू आहे.

मनोहर कुंभेजकर,मुंबई- महानगरपालिका निवडणुकीला अजून सहा महिने शिल्लक असले तरी भाजपाची पालिका निवडणुकीची तयारी सध्या सैराट सुरू आहे. पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती होणार नाही हे गृहीत धरून मुंबई भाजपाने पालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. सध्या पालिकेत भाजपाचे ३१ नगरसेवक आहेत. मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात षण्मुखानंद येथे झालेल्या भाजपा मेळाव्यात पालिका निवडणुकीत ११४ नगरसेवक कसे निवडून येतील, याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवून जोमाने कामाला लागा, असे आवाहन केल्यावर भाजपाने तयारी केल्याचे चित्र आहे.भाजपाने आता सर्व धर्मीयांमधील मतदारांशी थेट संपर्क सुरू केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री हे मुंबई भाजपाच्या विविध उपक्रमांत उत्साहाने सहभागी होत आहेत. यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी पश्चिम उपनगरला क्वचितच भेट दिली असेल; मात्र फडणवीस हे आतापर्यंत किमान १५ ते २० वेळा पश्चिम उपनगरातील भाजपाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. मुंबईत गुण्या गोंविदाने राहणाऱ्या उत्तर भारतीयांना मुंबईतून हद्दपार करणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी मुंबई भाजपातर्फे गोरेगाव (पूर्व) येथील एनएससी संकुलात उत्तर भारतीयांसाठी आयोजित बाटी चोखा संवाद कार्यक्रमात केले. मुंबईत प्रथमच बाटी चोखा खात या सभेत त्यांनी उपस्थितांशी भोजपुरीत संवाद साधला; शिवाय शेरोशायरी करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. यानिमित्ताने मुंबईत असलेल्या ४० लाख उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून स्वबळावर पालिका निवडणुकीत विजय मिळविण्याचे रणशिंग भाजपाने फुंकले आहे.