शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

आयारामांविरुद्ध भाजपात रोष

By admin | Updated: September 7, 2014 01:58 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यापैकी एकाचेही नाव शहा यांना माहीत नाही.

अतुल कुलकर्णी - मुंबई 
राष्ट्रवादी पक्षातून भाजपात आलेल्यांची चार चांगली कामे आम्हाला सांगा म्हणजे आम्ही ती जनतेला सांगून या नेत्यांसाठी मतं मागू, अशी तिरकस मागणी आता आयारामांच्या मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते करीत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यापैकी एकाचेही नाव शहा यांना माहीत नाही. यावरून त्यांची लोकप्रियता किती आहे हे दिसून येते.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनीही राष्ट्रवादीतून भाजपात आलेले दोषी आढळतील तर त्यांना पक्षातून काढून टाकू, असे सांगितले. त्यामुळे आगीतून उठून फुफाटय़ात आल्याची अवस्था झाल्याची भावना कार्यकत्र्यामध्ये आहे. एवढे दिवस ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही भाषणं केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून आम्ही कसे काय बसायचे, असा सवाल भाजपा कार्यकर्ते करीत आहेत. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते यांच्या विरोधात तर अधिक रोष आहे. आदिवासी विकास मंत्री असताना त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले होते.  भाजपाच्या आमदारांनीच ज्यांच्याविरोधात लक्ष्यवेधी मांडल्या, आज त्यांच्यावरच त्यांचा प्रचार करण्याची पाळी आली आहे. आजवर ज्यांच्या मतदारसंघात विरोधात प्रचार केला त्यांच्या कामगिरीचे कौतुक आम्ही कसे करणार, असा सवाल भाजपाचे निष्ठावंत विचारत आहेत. 
भास्करराव पाटील खतगावकर  यांना भाजपात घेतले खरे, परंतु नांदेडची जिल्हा बँक 
कोणामुळे बुडाली? चौकशीचा अहवाल सरकारने अजूनही बाहेर काढलेला नाही, मात्र भाजपाचे सरकार सत्तेवर आले तर हा अहवाल जनतेसमोर येणार आहे का, असे प्रश्न नांदेडमधील कार्यकर्ते नेत्यांना विचारत आहेत.