शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट नाकारल्याने भाजपा निष्ठावंतांचा उदे्रक

By admin | Updated: February 4, 2017 17:58 IST

निष्ठावंतांना तिकीट नाकारुन ऐनवेळी पक्षात आलेल्यांना तिकीट दिल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर उपोषण केले.

पुणे : भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या यादीत नाव असतानाही निष्ठावंतांना तिकीट नाकारुन ऐनवेळी पक्षात आलेल्यांना तिकीट दिल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर उपोषण केले.  सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास संतप्त  कार्यकर्त्यांच्या एका गटाने पक्षकार्यालयाबाहेर असलेल्या पोस्टरवरील शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या फोटोला काळे फासले़ 
 प्रभागातील प्रमुख नेत्याला सोबत कोण हवे, हे विचारात घेऊन त्यांना तिकिटे देण्यात आली़ त्याचा परिणाम अनेक गटांना तिकीट नाकारण्यात झाला़ ऐनवेळी यादीतील नावे बदलण्यात आली़ त्याचा उद्रेक पक्षकार्यालयासमोर पहायला मिळाला़ 
डहाणूकर कॉलनी प्रभाग क्रमांक १२ मध्ये ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी आणि अ‍ॅड़ वर्षा डहाळे यांचे नाव यादीमध्ये होते़ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या गेल्या होत्या. मात्र,  त्यांना डावलण्यात आले.  त्यामुळे संतप्त झालेल्या कुलकर्णी आणि वर्षा डहाळे यांनी पक्षकार्यालयासमोर उपोषणाला बसल्या. त्यानंतर  तिकीट नाकारल्या गेलेल्या अनेकांनी त्यांच्याबरोबर उपोषणाला  सुरुवात केली़ 
 आम्हाला तिकीट देणार म्हणून सांगितले होते़ मग आता पक्षकार्यालय फोडणाºयांना तिकिटे कशी दिली़, असा सवाल वर्षा डहाळे यांनी केला. डॉ़ अपर्णा गोसावी यांनी सांगितले, की आम्ही अनेक वर्षांपासून काम करीत आहोत़ प्रभाग क्रमांक १४ डेक्कन जिमखाना, मॉडेल कॉलनीमध्ये जुन्या २४ मधील सर्वांना पक्षाने उमेदवारी दिली आहे़ गोखलेनगर, वडारवाडी, मॉडेल कॉलनीमधील कोणालाही तिकीट दिले नाही़ 
डॉ़ राजेंद्र खेडेकर म्हणाले, प्रभाग क्रमांक ३१ मधून एकमेव स्थानिक असताना कुणबीचे प्रमाणपत्र घेऊन आलेल्याला उमेदवारी देण्यात आली आहे़ ओंकार कदम यांनी पैसे घेऊन तिकिटे दिल्याचा आरोप केला.  
शुभदा विटकर, भाऊसाहेब मोरे, मनीष साळुंके, प्रियंका मेमजादे, अब्दुल रेहमान अशा अनेकांनी या उपोषणात सहभाग घेतला़ हे उपोषण सुरू असतानाच पक्षातील काही कार्यकर्त्यांचा एक गट सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास तेथे आला़ त्यांनी शहराध्यक्ष योगेश गोगावले व अन्य आमदारांचा निषेध करण्यास सुरुवात केली़ तेथे असलेल्यांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला़ तरीही त्यांनी तेथे लावलेल्या पोस्टरमधील गोगावले यांच्या फोटोला काळे फासले़ त्यानंतर घोषणाबाजी करीत हा गट तेथून निघून गेला़ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक अजय तायडे यांनी प्रभाग क्रमांक १६ मधून अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे़