शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा पदाधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

By admin | Updated: July 11, 2016 05:36 IST

सेक्स रॅकेट प्रकरणातील महिला आरोपी शोभा गमलाडू हिचे शिवसेनेच्या नेत्यांसमवेत असणारे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी केडीएमटीचे

कल्याण : सेक्स रॅकेट प्रकरणातील महिला आरोपी शोभा गमलाडू हिचे शिवसेनेच्या नेत्यांसमवेत असणारे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी केडीएमटीचे परिवहन व जिल्हा भाजपा कार्यकारिणी सदस्य सुभाष म्हस्के यांच्या तोंडाला शाई फासून मारहाण केली. ही घटना रविवारी पूर्वेकडील लोकग्राम भागात घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सेक्स रॅकेट प्रकरणात उल्हासनगर शहरातील शिवसेनेच्या महिला पदाधिकारी गमलाडू यांना ठाणे समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. कल्याण पश्चिम येथील बिर्ला कॉलेजसमोरील एका हॉटेलमधून दोन मुलींच्या सुटकेसाठी केलेल्या कारवाईत ही अटक झाली. दरम्यान, ती शिवसेनेची पदाधिकारी नसून, सहा महिन्यांपूर्वीच शोभा यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शोभा यांचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर असलेले फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. हे फोटो म्हस्के यांनी व्हायरल केल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी त्यांना भररस्त्यात मारहाण केली. या वेळी म्हस्के यांच्या तोंडाला काळी शाईही फासली. आमच्या नेत्यांची बदनामी कराल, तर भाजपाच्या नेत्यांच्याही तोंडाला काळे फासू, असा इशारा दिला. (प्रतिनिधी)फोटो व्हायरल केलेले नाहीत - म्हस्केचक्कीनाका परिसरातून म्हस्के हे घरी परतत असताना ही घटना घडली. आपण अशा प्रकारचे कोणतेही फोटो व्हायरल केलेले नाहीत, असे म्हस्के यांचे म्हणणे आहे. दरम्यान, शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.