शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात कुणी गद्दार नाही!

By admin | Updated: July 4, 2016 04:36 IST

भाजपात गद्दार आहेत, असे मला वाटत नाही. कदाचित एकनाथ खडसे यांच्याकडे वेगळी माहिती असू शकते, असे सूचक विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.

जळगाव : भाजपात गद्दार आहेत, असे मला वाटत नाही. कदाचित एकनाथ खडसे यांच्याकडे वेगळी माहिती असू शकते, असे सूचक विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले. विशेष म्हणजे खा. रक्षा खडसे, आ. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीतच महाजन यांनी हे मत मांडले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी जळगावातच आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना, माझ्यावर जे आरोप झाले तो कटाचा एक भाग आहे. पक्षातील गद्दारांचा आधी बंदोबस्त करा, असे विधान केले होते. त्याबाबत छेडले असता महाजन म्हणाले की, पक्षात गद्दार असल्याचे मला वाटत नाही. मी मोठा नेता नाहीखडसे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत आपण महिनाभर गप्प का होते? यावर महाजन म्हणाले, खडसेंवरील आरोपांबाबत खुद्द खडसे त्यांच्या मागणीनुसार चौकशी सुरु असून लवकरच ती पूर्ण होईल व ते अग्निदिव्यातून तावून सलाखून बाहेर पडतील. आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खुलासा केला आहे. मी त्यांच्यापेक्षा मोठा नेता नाही. त्यामुळे खुलासा करण्याचा प्रश्नच येत नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जळगावला तापी महामंडळात विचारलेली माहिती त्यांना तोंडी स्वरुपात देण्यात आली. त्यांना कोणतीही कागदपत्रे दिलेली नाही. ती त्यांना हवी असल्यास त्यांनी माहितीचा अधिकार वापरावा, असेही महाजन म्हणाले. (प्रतिनिधी)>खडसे-महाजन एकाच व्यासपीठावरजळगावच्या जिल्हा बँक सभागृहात रविवारी राज्य ग्रामसेवक युनियनच्या मेळाव्यात एकनाथ खडसे, गिरीश महाजन व शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. काम करीत असताना चुका होतात. शासकीय कर्मचाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना किमान उत्तर तरी देता येते, परंतु आम्ही त्याचे उत्तरही देऊ शकत नाही. आरोपांबाबत कुणी पुरावेही दिले नाही. त्यानंतर काय शिक्षा झाली हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, अशी खंत खडसे यांनी मेळाव्यात व्यक्त केली.दमणगंगा-पिंजाळचे पाणी मुंबईलादमणगंगा-पिंजाळचे वाहून जाणारे पाणी मुंबईसाठी वळविण्यात येऊन मुंबईकरांची तहान भागविण्यात येईल. तसेच तापी-नर्मदाचे वाया जाणारे पाणीही गुजरातच्या सिमेवरुन उचलण्याचा प्रयत्न आहे. अन्यथा या पाण्याच्या बदल्यात गुजरातने महाराष्ट्राला पाणी द्यावे, अशीही आपली मागणी आहे.