शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-राष्ट्रवादीत झोंबाझोंबी

By admin | Updated: October 4, 2016 01:26 IST

महापालिकेची प्रारूप प्रभागरचना फुडल्याच्या आक्षेपावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय झोंबाझोंबी सुरू आहे.

पिंपरी : महापालिकेची प्रारूप प्रभागरचना फुडल्याच्या आक्षेपावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय झोंबाझोंबी सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, प्रारूप प्रभागरचना फुटल्याच्या वृत्ताचा पालिका प्रशासनाने इन्कार केला. आयुक्त दिनेश वाघमारे हे प्रशासनाची भूमिका मंगळवारी स्पष्ट करणार आहेत. भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कार्यालयातून सूत्रे हलवून प्रभाग फोडल्याचे आरोप होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रभाग बदलल्याप्रकरणी आक्षेप घेणार असल्याचे सूचित केले होते. त्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे यांनीही प्रारूप प्रभागरचनेप्रकरणी टीका केली होती. राष्ट्रवादी-भाजपाने आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी सोमवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन भाजपावर टीका केली आहे. चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीका भाजपावर केली आहे. त्यावर सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांच्या कक्षासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा; मग कोणी वॉर्ड फोडले, हे लक्षात येईल. राष्ट्रवादीच्या चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत, असे प्रतिटीका भाजपाने केली आहे. त्यामुळे प्रभागरचनेची ७ आॅक्टोबरला अधिकृत घोषणा होईपर्यंत भाजपा व राष्ट्रवादीत राजकीय झोंबाझोंबी सुरू राहणार आहे. पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ ला होणार आहे. याविषयी प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम २० आॅगस्टला निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार आराखडा तयार करून विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या समितीने निवडणूक आयोगाकडे अहवाल सात सप्टेंबरला सुपूर्त केला. ‘लोकमत’ने प्रारूप प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचे वृत्त सर्वप्रथम दिले होते. त्यानंतर १० सप्टेंबरला ‘सत्तेसाठी सीमारेषा बदलल्या’ हे वृत्त प्रकाशित केले होते. त्रिसदस्यीय समितीने आराखडा मंजूर केल्यानंतर १३ सप्टेंबरला नगरसेवकांची झोप उडणार, १५ सप्टेंबरला इच्छुक नगरसेवकांनी घेतली धास्ती, दहा प्रभाग म्हणजेच ४० वॉर्ड फोडले, अशी वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने भाजपावर आणि भाजपाने राष्ट्रवादीवर प्रभाग बदलल्याचा आरोप केला होता.