शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा, दाऊदशी माझा संबंध नाही - रियाज भाटी

By admin | Updated: October 21, 2016 15:25 IST

रियाज भाटी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना दाऊद इब्राहिम आणि भाजपाशी आपले कोणत्याही प्रकारचे संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.

  
ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 21 - दाऊदशी कथित संबंध असलेल्या रियाझ भाटीवरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार वाद पेटला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर रियाज भाटी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना दाऊद इब्राहिम आणि भाजपाशी आपले कोणत्याही प्रकारचे संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.  त्यामुळे या प्रकरणालाही नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.  
'दाऊद इब्राहिमशी माझा काहीही संबंध नाही. मी जर दाऊदचा माणूस असतो तर मला पोलीस संरक्षण मिळाले असते का?' असा सवाल भाटी यांनी विचारला आहे. ' माझ्यावर कुठल्याही प्रकारचा खटला दाखल नाही. नवाब मलिक यांनी बेताल आरोप करून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.' असे स्पष्टीकरण देत भाटी यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे. 
भाजपाशी  आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगंत त्यांच्याशी कोणताही वाद नसल्याचेही  त्यांनी स्पष्ट केले आहे. मी एमसीएच्या मार्केटिंग समितीचा अध्यक्ष असल्याने माझा आशीष शेलारांशी संपर्क होतो. तसेच शरद पवार यांचीही भेट होते, असे भाटी यांनी सांगितले. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नबाव मलिक यांनी दाऊद इब्राहिमशी संबंध असलेले रियाझ भाटी हे भाजपाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत असा आरोप करत अनेक गुन्हे दाखल असलेल्या रियाझ भाटीवर मोक्काअंतर्गत गुन्हा का दाखल झाला नाही? असा सवाल उपस्थित केला होता. भाजपाने मात्र मलिक यांचा आरोप फेटाळून लावताना भाटी कोण आहे ते शरद पवारच मलिक यांना चांगल्याप्रकारे समजावू शकतात, असा टोला लगावला होता.