शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामध्ये धुसफूस सुरूच

By admin | Updated: June 2, 2016 02:36 IST

विधान परिषदेसाठी मुंबईतून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि आर.एन.सिंह यांना उमेदवारी देऊ केल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असून आहे

मुंबई : विधान परिषदेसाठी मुंबईतून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि आर.एन.सिंह यांना उमेदवारी देऊ केल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असून आहे. बुधवारी मुंबईतील कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेत आपला संताप व्यक्त केला. यावर, तिकीट देण्याचा निर्णय माझा एकट्याचा नाही. हा सामूहिक निर्णय आहे. तरीही कार्यकर्त्यांची नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातले जाईल, असे आश्वासन दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिले. मुंबै बँकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप असणारे प्रवीण दरेकर यांच्यासह अलीकडेच भाजपात दाखल झालेले लाड आणि सिंह यांच्या उमेदवारीमुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते चांगलेच दुखावले आहेत. त्यामुळे मुंबईतील कार्यकर्त्यांची दानवे यांनी बैठक आयोजित केली होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या बंगल्यावरील बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आर. यु. सिंह, अमरजित मिश्रा, संजय पांडे, विवेकानंद गुप्ता आदी उत्तर भारतीय पदाधिका-यांसह सुनिल राणे व अन्य मराठी नेतेदेखील हजर झाले. मात्र, दानवे पक्ष कार्यालयातच थांबल्याने सारा लवाजमा तिकडे रवाना झाला.प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. आर.एन.सिंह भाजपाचे साधे सदस्यदेखिल नाहीत तरीही त्यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणा-या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. असाच प्रकार चालू राहिल्यास जे बिहार विधानसभा निवडणुकीत घडले त्याचीच पुनरावृत्ती मुंबई महापालिका निवडणुकीत पाहायला मिळेल. तुम्हाला पक्ष खड्ड्यात घालायचा आहे का, असा सवालच कार्यकर्त्यांनी दानवेंना केला. कार्यकर्त्यांच्या प्रश्नाच्या सरबत्तीमुळे दानवे यांनी काहीसा बचावात्मक पवित्रा घेत उमेदवारीचा निर्णय सामूहिक असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)