शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने फसविले - मेटे

By admin | Updated: July 9, 2016 02:55 IST

आपल्याला मंत्रिपद देण्याचा शब्द भाजपाने पाळला नाही. आपली फसवणूक केली, या शब्दांत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ विस्ताराला

मुंबई : आपल्याला मंत्रिपद देण्याचा शब्द भाजपाने पाळला नाही. आपली फसवणूक केली, या शब्दांत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ विस्ताराला तर ते अनुपस्थित होते.भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना अनुक्रमे कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळाले. रिपाइंचे रामदास आठवले यांना केंद्रात राज्यमंत्रिपद मिळाले. पण मेटेंना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. ते म्हणाले की, मित्रपक्षांना सन्मानाची वागणूक देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला होता. भाजपाच्या नेत्यांनीही मंत्रिमंडळात स्थान देण्याविषयी शब्द दिला होता. असे असताना इतरांना एक न्याय आणि मला वेगळा न्याय, असे का झाले हा माझ्या कार्यकर्त्यांचा सवाल आहे. मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही संघर्ष करीत आलो आहोत. अशावेळी सन्मान मिळत नसेल तर समाजातही नाराजीची भावना होते. अरबी समुद्रात उभारण्यात यावयाच्या छत्रपती शिवरायांच्या स्मारक समितीचे मेटे हे अध्यक्ष असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. हे कारण पुढे करत त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आल्याचे म्हटले जाते. मेटे यावर म्हणाले की, स्मारक हे माझे व सर्वच मराठी माणसांचे मिशन आहे. भाजपाने मला मंत्रिपदाचा शब्द दिला होता तो पाळला नाही. आता काय भूमिका घ्यायची हे कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरवू.