शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला काँग्रेसचीच साथ

By admin | Updated: March 24, 2017 01:46 IST

‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा देऊन सोनिया गांधी व राहुल गांधींवर थेट टीका करणाऱ्या भाजपाला खुद्द काँग्रेसनेच केवळ

यवतमाळ : ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा देऊन सोनिया गांधी व राहुल गांधींवर थेट टीका करणाऱ्या भाजपाला खुद्द काँग्रेसनेच केवळ सत्तेच्या लालसेपोटी साथ दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यवतमाळ, जळगावसह राज्यात अनेक ठिकाणी हे विसंगत चित्र पहायला मिळाले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपाने ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केली. त्यासाठी काँग्रेस पक्षच नव्हे तर या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भाजपाने टार्गेट केले. संपूर्ण निवडणूक प्रचारात ‘काँग्रेसमुक्त भारत’ हाच मुख्य अजेंडा ठेवण्यात आला होता. काँग्रेसला देशातून हाकलून लावू पाहणाऱ्या भाजपाला धडा शिकवणे, त्यांच्यापासून अंतर राखून रहाणे, शक्य असेल तेथे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे, त्यांच्या जातीयवादी विचारधारेला जनतेपुढे उघडे करणे आदी प्रयत्न काँग्रेसकडून होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांनी भाजपाला विरोध करण्याऐवजी केवळ सत्तेसाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे पसंत केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला मुठमाती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका राज्यात पार पडल्या. या निवडणुकीत विरोधी बाकावर बसावे लागले तरी चालेल, मात्र जातीयवादी पक्षांशी युती करू नका, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतली होती. परंतु त्यांच्या या भूमिकेला काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी छेद देऊन जातीयवादीय पक्षांना सत्तेत मदतीचा हात दिला. कुठे प्रत्यक्ष पाठिंबा देऊन तर कुठे सभागृहात अनुपस्थित राहून काँग्रेसने भाजपाला पाठबळ दिल्याचे चित्र आहे.यवतमाळात ठाकरे-मोघेंचा खेळ यवतमाळात भाजपाच्या पाठिंब्यावर काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले. सुरुवातीला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा त्यासाठी आग्रह होता. अन्य काही नेते विरोधात होते. मात्र अध्यक्षपदाचा लालदिवा आपल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात येऊ शकतो याची जाणीव होताच माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे हेसुद्धा भाजपाचा पाठिंबा घेण्यासाठी तयार झाले. ठाकरे-मोघेंच्या मागे जिल्ह्यातील काँग्रेसचे अन्य नेतेही वाहवत गेले. जळगावातही भाजपा-काँग्रेसची सत्ता बसली. अन्य काही ठिकाणीसुद्धा अशी छुपी अ‍ॅडजेस्टमेंट करण्यात आल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)काँग्रेसला संपविणे हेच टार्गेट-काँग्रेसला संपविण्यासाठी विविध पर्याय भाजपाकडून अवलंबिले जात आहे. काँग्रेसमधील नाराज, दुखावलेल्या व असंतुष्ट कार्यकर्त्यांना उमेदवारी, लाभ, पदाचे आमिष देऊन मोठ्या प्रमाणात भाजपात आणले जात आहे. आता सत्तेत वाटेकरी करून काँग्रेसच्या नैतिकतेलाच भाजपाकडून सुरूंग लावला गेला आहे. सत्तेसाठी भाजपाची साथ घेतल्याने आता काँग्रेस नेते-पदाधिकाऱ्यांना भाजपाला जातीयवादी पक्ष म्हणण्याची नैतिकताच उरलेली नाही. काँग्रेसचे तोंड बंद करण्याची भाजपाची ही खेळी यशस्वी झाल्याचे दिसते.अध्यक्ष काँग्रेसचा, रिमोट भाजपाकडे-यवतमाळात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचा असला तरी सत्तेची सर्व सूत्रे व रिमोट भाजपाच्या हाती आहे. या माध्यमातूनही काँग्रेसला संपविण्याचा प्रयत्न होतो आहे. काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असली तरी जाहिरात फलकांवर केवळ भाजपा नेत्यांची छायाचित्रे झळकत असून काँग्रेस बरीच मागे पडली आहे.‘काँग्रेस का हाथ, मोदी के साथ’ -भाजपा-काँग्रेसच्या या सत्ता-समीकरणावर सोशल मीडियावरून काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली जात आहे. ‘काँग्रेस का हाथ, मोदी के साथ’ असा प्रचार करुन ‘काँग्रेसमुक्त भारत’ या भाजपाच्या घोषणेला त्यांच्या पाठीराख्यांकडून आणखी सशक्त केले जात आहे. सत्तेसाठी काँग्रेस काय करू शकते, हे जनतेला दाखविण्याचा प्रयत्न या निमित्ताने भाजपा समर्थकांकडून होत आहे.