शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-सेना-मनसेत राडा

By admin | Updated: February 16, 2017 05:13 IST

मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरणही तापत असल्याचा प्रत्यय बुधवारी सायन कोळीवाड्यात आला.

मुंबई : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरणही तापत असल्याचा प्रत्यय बुधवारी सायन कोळीवाड्यात आला. परिसरात काढण्यात आलेल्या भाजपाच्या प्रचार फेरीवर मनसे आणि शिवसेनेने आक्षेप घेतला. त्यानंतर तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने येऊन त्यांच्यात तुफान शाब्दिक चकमक झाली. पुढे याचे रूपांतर हाणामारीत झाल्याने परिसरात तब्बल एक ते दीड तास तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलिसांना धक्काबुक्की झाल्याने प्रकरण अधिकच चिघळले.सायन कोळीवाडा येथील भाजपा उमेदवाराने प्रचारासाठी पुणे येथील बालाजी कॉलेजमधून १०० ते १५० विद्यार्थी प्रचारासाठी बोलावले होते. सुटाबुटात आलेले हे विद्यार्थी घरोघरी जाऊन प्रचार करत होते. ही बाब तेथील शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांना समजताच त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढे धाडले. प्रचाराची परवानगी घेतली होती का, असा सवाल उपस्थित करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी यातील काही प्रचारकांना त्यांच्याच कार्यालयात डांबले. थोड्या वेळात शिवसैनिकही तेथे जमले. ही बाब भाजपा उमेदवाराला समजताच तेथे भाजपाचे पदाधिकारी दाखल झाले. त्यांनीही या प्रकाराला विरोध दर्शवला. तिन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक वाढली. शिवीगाळीबरोबरच एकमेकांविरुद्ध घोषणाबाजीचा सूर वाढला. पुढे याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त एन. अंबिका, अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नासीर ए. अब्दुल एच. शेख पोलिसांसह तेथे दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये भरले. याच रागात त्यांनी पोलिसांसोबतही झटापट केली. यामध्ये फौजदार मोहिते जखमी झाले आहेत. कार्यकर्त्यांना तत्काळ अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. (प्रतिनिधी)