शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

टीकाखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा?

By admin | Updated: November 12, 2015 03:30 IST

बिहारमधील पराभवावरून लालकृष्ण अडवाणींसह चार ज्येष्ठ नेत्यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर नितीन गडकरी यांनी या दोघांचा जोरदार बचाव केला

अडवाणींच्या नेतृत्वातही पराभव झालाच होता की!नागपूर : बिहारमधील पराभवावरून लालकृष्ण अडवाणींसह चार ज्येष्ठ नेत्यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोघांचा जोरदार बचाव केला. या बुजुर्गांवर थेट पलटवार करताना त्यांनी पक्षातील परंपरा आणि अडवाणींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकांमधील पराभवाचे स्मरण करून दिले. इतकेच नव्हे, तर मोदी आणि शहा यांच्या विरोधात बेजबाबदार जाहीर वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची जाहीर भूमिका गडकरी यांनी घेतली. बिहारमध्ये भाजपाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पक्षात मतभेदांचे फटाके जोरात वाजू लागले आहेत. ही फटाकेबाजी अजून थांबलेली नाही. मंगळवारीच लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि शांताकुमार यांनी मोदी-शहा यांच्यावर हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर गडकरी येथे पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले की, या पराभवाबद्दल केवळ मोदी आणि शहा यांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही. या पराभवाची सर्व पदाधिकारी आणि नेत्यांची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ मोदी आणि शहा यांना जबाबदार धरणाऱ्यांची वक्तव्ये बेजबाबदार आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. नितीशकुमारांचा चिमटादारुण पराभवानंतर भाजपात सुरू झालेल्या सुंदोपसुंदीवर आपण काही बोलणार नाही, असे म्हणत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी खास शैलीत चिमटा काढला. ‘दूर बैठे हुए व्यक्ती की तरह देख सकता हूँ’, असे सांगत ते म्हणाले, प्रचारात एवढा आटापिटा करूनही पराभव झाल्याने असे होणे स्वाभाविक आहे.नाही तरी प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया होतच असते! ‘अटल, अडवाणी और मुरली मनोहर, भाजपा के तीन धरोहर’ हे या पक्षाचे पूर्वी घोषवाक्य होते, याचेही त्यांनी खुबीने स्मरण करून दिले.अडवाणी, जोशी यांनी जारी केलेल्या निवेदनावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही या मुद्द्यावर अडवाणींशी चर्चा करणार आहोत. बिहारमध्ये आमचा पक्ष आणखी बळकट करण्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. बिहारमधील पराभवानंतर अमित शहा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. सेनेचाही टोलाभाजपात लालकृष्ण अडवाणी यांचा लेटरबॉम्बच नाही तर अजून बरीच बॉम्बाबॉम्ब व्हायची आहे, असे भाकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण येथे व्यक्त केले. -वृत्त/४