शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता जपण्यासाठी देशी झाडांची लागवड गरजेची

By admin | Updated: March 6, 2017 01:22 IST

भौगोलिक क्षेत्रापैकी किमान ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असावे, असे सांगितले जाते.

बारामती : भौगोलिक क्षेत्रापैकी किमान ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असावे, असे सांगितले जाते. मात्र, महाराष्ट्रात कागदोपत्री २०.४ टक्केच क्षेत्र वनक्षेत्राखाली असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळात देशी वनसंपदा जतन करणे, देशी झाडांची लागवड जास्तीत जास्त करणे आवश्यक असताना, ज्या परदेशी झाडांची आवश्यकता नसताना मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते त्यामुळे जैवविविधता नष्ट होत आहे. त्यामुळे वाढते तापमान, वातावरणातील बदल दूर करण्यासाठी दीर्घकालीन विकासासाठी स्थानिक देशी वृक्षारोपणाची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी चित्रपट अभिनेते तथा पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना (वन) आवाहन केले आहे.आई जन्म देते आणि झाड माणसाला श्वास देत जगवत असते. ज्या झाडाचे पान, फूल, फळ, मूळ आपण खाऊ शकतो, अशीच झाडे लावली पाहिजे. त्याचबरोबर जैवविविधता वाढेल, याचीदेखील काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड, सुहास वायगणकर, प्रा. लक्ष्मी शिंदे, डॉ. पाटील, प्रसाद मगदूम या पर्यावरण संशोधकांनी याबाबत संपूर्ण राज्यात दौरा केला. शाळा, महाविद्यालयस्तरावर जनजागृती केली. शास्त्रीयदृष्ट्या देशी झाडेच पर्यावरण रक्षण करू शकतात. त्यामुळे केवळ परदेशी शोभिवंत झाडे लावण्यापेक्षा देशी झाडांनाच महत्त्व द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परदेशी झाडांचा धोकाच अधिक....सध्या निलगिरी, आॅस्ट्रेलियन बाभुळ, गिरीपुष्प, अशोक, गुलमोहर, निलमोहर, पिचकारी, रेन ट्री, सिल्व्हर ओक, सुरू, अशी झाडे लावण्यावर भर दिला जात आहे. ही झाडे पर्यावरणाला हानीकारक आहेत. जैवविविधेतेच्या दृष्टीने उपयोगी नाहीत. ही झाडे भूगर्भातील पाणी अधिक खेचतात. या झाडांची पाने लवकर कुजत नाहीत. परिणामी तेथे कीटक, सूक्ष्म जीवजंतू येत नाहीत. जैविक विघटन होत नाही. वादळात, मोठ्या पावसात ही झाडे मोठ्या प्रमाणात उन्मळून पडतात. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे पर्यावरण रक्षण होत नाही. त्यामुळे देशी झाडांनाच राज्यात सर्व ठिकाणी प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांसह सामाजिक वनविभाग, सामाजिक वनीकरण आदींना याबाबत सुचित करावे, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)>देशी झाडांमुळे जैवविविधता...परदेशी झाडे सर्वांनाच हानीकारक आहेत. चुकीच्या झाडांचे रोपण केल्यामुळे माळढोक पक्षी सोलापूरमधून दुर्मिळ होत आहे. पश्चिम घाटात निलगिरीच्या दाट भागातून भातखचरा नुकसान होत आहे. माण तालुक्यात सह्याद्री देवराई या प्रकल्पांतर्गत ५० पेक्षा स्थानिक प्रजाती झाडांना महत्त्व दिले. त्यामुळे ६ हजार झाडे लावण्यात आली. त्यातून पर्यावरण रक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. वड, आंबा, पिंपळ, चिंच, रामफळ, सीताफळ, नांद्रुक, बाभूळ, बोर, उंबर, जांभूळ, शेवगा, बिबा, रूद्राक्ष, कवट, वेल, कडीपत्ता, लिंबू, अंजीर, खैर, विलायती चिंच, अर्जुनी, अंजन, कांचन, मेडशिंगी, महारूग, पारिजातक, कळक, तुती, रक्तचंदन, देवबाभुळ, बोकर, सिंधी, रिटा, हेरडा, भेगडा, आपटा, सीतेचा अशोक, गुळभेंडी, सोनचाफा, बहावा, मोहगनी अशा देशी झाडांची वातावरणानुसार लागवड उपयुक्त ठरणार आहे.>जनजागृती...येथील निसर्ग जागर प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. महेश गायकवाड यांनी पुणे शहर, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांसह राज्यात याबाबत जनजागृती केली आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना झाडे लावताना स्थानिक झाडांचा विचार करावा. पर्यावरणपूरक झाडांमुळे वन्यजीवांनादेखील फायदा होतो, अशी जनजागृती गेल्या काही वर्षांपासून सुरू केली आहे.