शिरूर (जि. पुणे) : गुंतवणुकीच्या नावाखाली महिन्याला दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील करडे येथील ५ जणांना ९ कोटी ३२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या कौशल इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. या कंपनीच्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुजरातमध्ये जेरबंद केले. न्यायालयाने २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.कौशल विनोदकुमार ठाकर (३३) असे त्याचे नाव आहे़ त्याने ५ साथीदारांसह कौशल इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. ही कंपनी स्थापन करून करडे (ता. शिरूर) येथे बस्तान बसविले होते. सीमाशुल्क विभागाने पकडलेला माल (सोने, चांदी, तांबे, टीव्ही, एलईडी, मोबाईल, एसी आदी) विकत घेऊन त्याची विक्री केली जाते. यातील मुद्दल पुन्हा ३० दिवसांसाठी गुंतवणूक म्हणून ठेवून घ्यायचे. ३ कोटींची रोकड जप्त : अपहार केलेल्या रकमेबाबत ठाकर यांच्याकडे तपास केला असता, जुलै महिन्यात बंडगार्डन रोडवरील एका ज्वेलर्सकडे सोने खरेदीसाठी ३ कोटी ७ लाख रुपये ठेवल्याचे सांगितले़ या ज्वेलर्सच्या मालकास ठाकर याच्या अटकेबाबत माहिती मिळताच त्याने ही रक्कम जमा केली.
कोट्यवधीची फसवणूक; संचालकाला अटक
By admin | Updated: August 22, 2015 23:26 IST