शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

३५ हजार कोटींच्या अधिकारांवर तुळशीपत्र

By admin | Updated: September 22, 2014 09:50 IST

शिवसेना-भाजपा युती तुटली तर मुंबई, ठाणेसह प्रमुख महापालिका व नगरपालिकांमधील किमान ३५ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक अधिकारांवर या दोन्ही पक्षांना तुळशीपत्र ठेवायला लागेल.

शिवसेना-भाजपा युतीतील तणाव : चार महापालिकांमधील सत्तेची समीकरणे बिघडणार संदीप प्रधान, मुंबईशिवसेना-भाजपा युती तुटली तर मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, अंबरनाथ, बदलापूर अशा प्रमुख महापालिका व नगरपालिकांमधील किमान ३५ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक अधिकारांवर या दोन्ही पक्षांना तुळशीपत्र ठेवायला लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती फुटल्याने राज्याची सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंग होतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील असलेली सत्ता गमावण्याचा तुघलकी निर्णय दोन्ही पक्ष घेतील अशी शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.मुंबई महापालिकेत दीर्घकाळ शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. सध्या तेथे शिवसेनेचे ७५ तर भाजपाचे ३१ नगरसेवक आहेत. युती तुटल्यास शिवसेनेला सत्ता टिकवण्याकरिता मनसेच्या २८ नगरसेवकांची मदत घ्यावी लागेल. अथवा विरोधक या दोन्ही पक्षांना बाजूला सारून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतील. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३० हजार कोटी रुपयांचा आहे. ही महापालिका म्हणजे शिवसेनेकरिता जीव की प्राण आहे. त्यामुळे युती तुटली आणि मुंबई महापालिकेतील सत्ता शिवसेनेने गमावली तर तो शिवसेनेच्या जिव्हारी हल्ला असेल.ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ५३ सदस्य असून काँग्रेसमधील सहा नगरसेवक काही दिवसांपूर्वी रवी फाटक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत दाखल झाले. त्यापैकी चार शिवसेनेसोबत आहेत. भाजपाचे केवळ आठ तर मनसेचे सात नगरसेवक येथे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड युती तुटल्यावर २२०० कोटींचा अर्थसंकल्प असलेली ही महापालिका ताब्यात घेण्याची संधी सोडणार नाहीत. येथेही मनसेचा पाठिंबा मिळाला तर शिवसेनेची सत्ता कदाचित टिकून राहील. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे ३२, भाजपाचे नऊ तर मनसेचे २८ नगरसेवक आहेत. येथेही युती तुटली तर १६०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली ही महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्याकरिता शिवसेनेला खटपट करावी लागेल. पुढील वर्षी येथे निवडणूक असल्याने राज्यात फुटीमुळे युतीची सत्ता येणार नसेल तर काही नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूला वळू शकतात.औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचे ३०, भाजपाचे १५ तर मनसेचा एक नगरसेवक आहे. काही अपक्ष व भारिप-बहुजन महासंघ यांचा पाठिंबा युतीला आहे. युती फुटली तर येथील राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. या महापालिकेचा अर्थसंकल्प ७९० कोटींचा आहे. नगरपालिकांमध्येही एकत्रअंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांमध्येही युतीची सत्ता असून या दोन्ही नगरपालिकांचा अर्थसंकल्प प्रत्येकी २०० कोटींचा आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेचे १७, भाजपाचा एक तर मनसेचे सात सदस्य आहेत. बदलापूरमध्ये शिवसेनेचे १३, भाजपाचे सात तर मनसेचे तीन सदस्य आहेत. महापालिकांचे वार्षिक अर्थसंकल्पमुंबई - ३०,००० कोटी  ठाणे- २२०० कोटीकल्याण-डोंबिवली -  १६०० कोटीऔरंगाबाद - ७९० कोटी

अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका - २०० कोटी