शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांचा मुक्काम तुरूंगातच

By admin | Updated: June 17, 2016 03:08 IST

वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात यावा, अशी केस अर्जदाराने बनवली नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने ८४० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी

मुंबई : वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात यावा, अशी केस अर्जदाराने बनवली नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने ८४० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी व राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची जामिनावर तात्पुरती सुटका करण्यास नकार दिला. या आधी पीएमएलए कोर्टाने त्यांना जामीन नाकारला होता.छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असला तरी न्या. पी.एन. देशमुख यांनी कारागृह प्रशासनाला आवश्यक असेल तेव्हा भुजबळांना शासकीय रुग्णालयात उपचार करण्याचे निर्देश दिले.उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या अनेक व्याधी भुजबळांना असल्याने त्यांना यावर उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णालयात दाखल करायचे आहे. त्याकरिता त्यांची तात्पुरत्या जामिनावर सुटका करावी, अशी मागणी छगन भुजबळ यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयाकडे केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित करण्यात आलेल्या नऊ डॉक्टरांच्या पॅनलने छगन भुजबळांच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या. या वैद्यकीय अहवालात अनेक त्रुटी असल्याचे अ‍ॅड. देसाई यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले. चाचण्यांची वेळ आणि भुजबळांची जन्म तारीख वेगळी टाकली असल्याचे अ‍ॅड. देसाई यांनी न्या. देशमुख यांना सांगितले. त्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रुग्णालयातील मशिन्समधील बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने ईसीजी चाचणीची वेळ आणि भुजबळ यांच्या जन्म तारखेमध्ये बदल झाला, असे स्पष्टीकरण खंडपीठाला दिले. न्या. देशमुख यांनी हे स्पष्टीकरण समाधानकारक नाही, असे सांगितले.‘तपास यंत्रणेचे स्पष्टीकरण पुरेसे नाही. मात्र अर्जदारावर असलेले आरोप गंभीर आहेत. तसेच त्यांच्या पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट) अंतर्गत नोंदण्यात आलेल्या गुन्ह्यांचा अद्याप तपास पूर्ण झाला नाही. त्यामुळे अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात येत आहे,’ असे न्या. देशमुख यांनी म्हटले. (प्रतिनिधी)आरोप गंभीर असल्याचे कारणयापूर्वी भुजबळांनी जामिनासाठी पीएमएलएकडे अर्ज केला होता. विशेष न्यायालयानेही त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, असे म्हणत जामीन फेटाळला होता. त्यामुळे भुजबळांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा दिला नाही.