शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांची १६० कोटींची जमीन ईडीच्या ताब्यात

By admin | Updated: November 14, 2015 03:56 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर हे संचालक असलेल्या हेक्स वर्ल्ड या कंपनीच्या १६० कोटींच्या खारघरस्थित जमिनीवर सक्तवसुली संचानालयाच्या

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर हे संचालक असलेल्या हेक्स वर्ल्ड या कंपनीच्या १६० कोटींच्या खारघरस्थित जमिनीवर सक्तवसुली संचानालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी टाच आणली. हा भुजबळांना जबर हादरा मानला जात आहे. देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रवर्तक असलेल्या या जमिनीची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार १६० कोटींच्या घरात जाते, असे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. ७१ कोटी रुपयांत खरेदी केलेल्या या जमिनीवर हेक्स वर्ल्डचा गृहप्रकल्प उभारण्यात येणार होता. यासाठी पैैसा कसा आला, याचा छडा लावण्यात आला असून मुंबई आणि इतर ठिकाणीही, लवकरच अशा प्रकारची जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. २०१०मध्ये १० टक्के अ‍ॅडव्हान्स रक्कम देऊन २३०० लोकांनी या प्रकल्पातील घरांसाठी बुकिंग केली होती. तथापि, वादामुळे २०१४पर्यंत या प्रकल्पाच्या कामात काहीच प्रगती झाली नाही. परिणामी हे प्रकरण कोर्टात गेले. या प्रकल्पासाठी गुंतवणुकदारांकडून २५ कोटी रुपये उभे करण्यात आले, तर उर्वरित पैैसा अन्य मार्गाने उभा करण्यात आला, असेही ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.तळोजा पोलिसांनी १३ जून रोजी एफआयआर दाखल केल्यानंतर १७ जून रोजी ईडीने समीर आणि पंकज भुजबळ तसेच अन्य तिघांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये ईसीआयआर (एन्फोर्समेन्ट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट) दाखल केला होता. (विशेष प्रतिनिधी)भुजबळांचे वकील अ‍ॅड. सजल यादव यांनी या घडामोडीबाबत सांगितले की, कोणत्याही जप्तीबाबत आम्हाला सूचना मिळालेली नाही. ईडीला आम्ही फक्त दस्तावेज दिले होते. व्यावसायिक प्रतिस्पर्धीच्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेली जप्तीची कारवाई बेकायदेशीर असून योग्य ती कारवाई केली जाईल.महाराष्ट्र सदन बांधकाम आणि कलिना सेंट्रल लायब्ररी प्रकरणाचीही ईडी चौकशी करीत आहेत. या दोन्ही घोटाळ्यांमुळे सरकारचे ८६८.६६ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे ईडीने ईसीआयआरमध्ये म्हटले आहे. सप्टेंबरमध्येही ईडीने महाराष्ट्र सदन प्रकरणात चमणकर एंटरप्रायजेसची मुंबईतील १७.३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.