शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांच्या ९० कोटींवर टाच!

By admin | Updated: August 12, 2016 04:48 IST

गेल्या काही महिन्यांपासून आॅर्थर रोड जेलमध्ये कैदेत असलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून आॅर्थर रोड जेलमध्ये कैदेत असलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी भुजबळ व कुटुंबीयांच्या मुंबई, नाशिक व अहमदनगरमधील विविध २२ स्थावर मालमत्ता जप्त केल्या. बेकायदेशीररीत्या कोट्यवधींची मालमत्ता बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्तांची एकूण किंमत सुमारे ९० कोटी असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अशा प्रकारे आत्तापर्यंत ‘ईडी’ने जप्त केलेल्या भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तांचे मूल्य आता ४३३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ईडीने गुरुवारी ‘मनी लॉन्ड्रिंग’प्रतिबंधक कायद्यांतर्गत केलेल्या कारवाईत मुंबईतील दादर येथील साईकुंज बिल्डिंग, नाशिकमधील औद्योगिक जमीन, वायनरी प्रकल, द्राक्षांच्या बागा, तसेच अहमदनगरमधील शेतजमीन आदींचा समावेश आहे. माजी मंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ गेल्या काही महिन्यांपासून आॅर्थर रोड कारागृहात आहेत. या प्रकरणी भुजबळांचे पुत्र व राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांना उच्च न्यायालयाने नुकताच अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी विविध कंपन्यांच्या संगनमताने आर्थिक गैरव्यवहार करत कोट्यवधींची मालमत्ता गोळा केल्याचा ‘ईडी’ने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा, मुंबईतील कलिनातील भूखंड घोटाळ््यातून हा अपहार केल्याचा ईडीचा दावा आहे.सक्तवसुली संचालनालयाने ३० मार्चला न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये भुजबळ पिता पुत्र व पुतण्याशिवाय, डीबी रिअ‍ॅलिटी, बलवा ग्रुप, नील कमल रिअ‍ॅलटर्स अँड बिल्डर्स, नीलकमल सेंट्रल अपार्टमेंट, एलएलपी आणि काकडे इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपन्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)........................................भुजबळ साडेसहा महिने कोठडीतराज्यात सत्तांतर झाल्यानंतर भुजबळ कुटुंबियांच्या पाठीमागे कारवाईचा ससेमिरा लागला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व ईडीने मनी लॉन्ड्रिंग, महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणाचा तपास शिताफीने केला. यावर्षीच्या सुरवातीला पहिल्यांदा समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली. त्यानंतर छगन भुजबळ यांनाही अटक झाली. गेल्या साडेसहा महिन्यांपासून ते कोठडीत आहेत.