शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

भोर तालुका : वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

By admin | Updated: May 6, 2017 02:07 IST

शहर व परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह सुमारे २ तास झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे मोडून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : शहर व परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह सुमारे २ तास झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे मोडून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या असून खांब वाकले आहेत. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर गारांच्या पावसामुळे आंबा पिकाचे व वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शहरात सर्वत्र पाण्याची तळी साचली आहेत. मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या उकाड्यामुळे भोर शहर व परिसरात विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारांचा सायंकाळी ५ वाजता पावसाला सुरुवात झाली सुमारे २ तास पाऊस झाला. यामुळे तापलेल्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र सदरच्या पावसामुळे भोर शहरातील रामबाग येथील ग्रामीण रुग्णालयासमोरची दोन झाडे तर पंचायत समितीच्या इमारतीजवळचे एक झाड मोडून पडले विजेच्या तारेवरच पडले आहे. वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह झालेल्या गारांच्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात झाडे विजेच्या तारेवर पडल्याने तारा तुटल्या असून खांब वाकले आहेत. यामुळे संपूर्ण तालुक्याचा वीजपुरवठा खंडित झाला असल्याने तालुका अंधारात आहे.अवकाळी गारांच्या पावसामुळे झाडावरचा आंबा खराब झाला आहे. तर गवत, पेंढा व जळणाची लाकडे भिजली आहेत. अचानक झालेल्या पावसामुळे वीटभट्ट्यांवरील वीट भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने चांगलाच फटका दिला आहे.अचानक झालेल्या पावसामुळे वीटभट्ट्यांवरील वीट भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. २०१५ साली पावसाळ्यानंतर प्रत्येक महिन्यात वळवाचे पाऊस झाले होते. इंदापूरलाही पावसाची हजेरीलासुर्णे : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बेलवाडी, लासुर्णे, कळंब आदी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात कमालीची उष्णता होती. सायंकाळी ६ वाजता आकाशात काळे ढग जमा झाले. दोन तास पावसाचे वातवरण झाले होते. अखेर ९:३0 ला पावसाला सुरूवात झाली. वादळी वाऱ्यासह तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने जनावरांच्या ओल्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे. परंतु फळबागांना मात्र तडाखा बसला आहे.नसरापूरला अर्धा तास बरसलानसरापूर : सायंकाळी सहाच्या सुमारास नसरापूर आणि परिसरात वाऱ्यासह जवळपास अर्धा तास अवकाळी पाऊस झाला. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होऊन शेतकऱ्यांचा कांदा भिजल्याने नुकसान झाले. नसरापूर व परिसरात पाऊस सुरू झाल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी दुकानाच्या आडोशाला उभे राहणे पसंत केले. मात्र, बालगोपालांनी पहिल्यावहिल्या पावसात भिजून आनंद घेतला. पाऊस सुरू झाल्याने येथील काही शेतकऱ्यांचा शेतात काढून ठेवलेला कांदा भिजून नुकसान झाले. तसेच नसरापूरलगतच्या गावांमध्ये कमी अधिक वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. वीज कोसळून कांदाचाळ खाकओझर : शिरोली बुद्रुक येथे शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास येथील सहकारनगर सोसायटीच्या जवळ दोन ठिकाणी वीज कोसळली. पहिली वीज ही शिवाजी थोरवे यांच्या घरातील नारळाच्या झाडावर कोसळली. यात संपूर्ण नारळाचे झाड जळाले. तर काही अंतराच्या वेळातच ७०० मीटर अंतरावर दुधाऱ्या डोंगराजवळील शेतकरी अंकुश रामभाऊ थोरवे यांच्या कांदा चाळीवर वीज पडल्याने कांदा चाळ पूर्णपणे भस्मसात झाली. या घटनेत दोघे जखमी झाले. शिरोलीला संध्याकाळी ७ च्या सुमारास वेगाने वारे वाहू लागले. यानंतर वीजा कडाडू लागल्या. ७.३० च्या दरम्यान पहिली वीज शिवाजी थोरवे यांच्या घरातील नारळाच्या झाडावर कोसळली. ही वीज कोसळल्याच्या थोड्या अंतरावर अंकुश थोरवे यांच्या शेतातील कांदाचाळीवर वीज कोसळली. यामुळे कांदा चाळ पूर्णपणे जळाली. ही आग विझावताना त्यांचे मुलगा सचिन व गणेश थोरवे हे जखमी झाले. त्यांच्यावर जुन्नर येथील डॉ. मोकाशी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.