शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

भोंदूबाबा मंत्र्यांना झाडावर चढवितात - सुशीलकुमार शिंदे

By admin | Updated: July 29, 2016 16:21 IST

भोंदूबाबांचा मंत्र्यांकडे राबता असतो. ते नेहमीच मंत्र्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवित असतात. मलाही एकदा बाळसाहेब ठाकरे यांनी एका बाबाकडे नेले होते.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २९ : भोंदूबाबांचा मंत्र्यांकडे राबता असतो. ते नेहमीच मंत्र्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवित असतात. मलाही एकदा बाळसाहेब ठाकरे यांनी एका बाबाकडे नेले होते. त्या भोंदूबाबाने माझ्या कपाळाला हात लावला अन् मला शॉक बसला. या बाबाच्या भोंदूगिरीबद्दल मला संशय आलाच होता आणि कालांतराने तो महाराष्ट्र पोलिसांच्या जाळ्यातही सापडला... माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे येथील एका कार्यक्रमात म्हणाले.

अंधश्रध्दा निमूर्लन समितीचे कार्यकर्ते शहाजी भोसले यांना शिंदे यांच्या हस्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले समाज सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, मंत्रीपदाच्या काळात माझ्याकडे अनेक बुवा यायचे अन् हरभऱ्याच्या झाडावर चढवायचे. कधी कधी कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडायची. त्यांचं सांगणं खरं व्हायचं. १९८० साली मी दुसऱ्या पक्षातून काँग्रेस आयमध्ये आलो. बॅ. ए. आर. अंतुले त्यावेळी मुख्यमंत्री झालो.

मी दुसऱ्या पक्षातून आल्यामुळे मला मंत्रीपद मिळायची शक्यता वाटत नव्हती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे जीवलग मित्र. ते म्हणायचे, तुम्ही मुख्यमंत्री व्हायच्या लायकीचे आहात; पण कुठे अडथळा येतो, पाहुयात, असे सांगून ते मला एका बाबाकडे घेऊन गेले. त्या बाबाने माझ्या कपाळाला हात लावल्यावर मला शॉक बसला; पण त्याच्याबद्दल शंका आली.

बाळासाहेबांना मी तसे म्हणालोही. बाळासाहेबांनी मग त्याला शिवसेना भवनात बोलाविले. तिथेही त्याने चमत्कार करून दाखविले; पण तरीही मला तो भोंदू वाटत होता. पुढे या बाबाला अटक झाली....शिंदे सांगत होते.